Asha Bhosle Passed Away: अलौकिक स्वरांची देणगी लाभलेल्या दिग्गज गायिका आशा भोसले यांचे रविवारी ( 12 एप्रिल 2026) निधन झाले. (Asha Bhosle Passed Away) वयाच्या 13 व्या वर्षांपासून आपल्या आवाजाची रुंजी ऐकणाऱ्याच्या मनावर घालणाऱ्या आशा भोसले यांनी 92 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या आठ दशकांमध्ये 12 हजाराहून अधिक एकापेक्षा एक सुरेल आणि भिन्न ढंगातील शैलीतील गाणी गात अजरामर झालेल्या आशा भोसले आज दिगंताच्या प्रवासाला निघून गेल्या आहेत. त्यांच्या निधनानंतर स्वतःच्या हस्ताक्षरातील एक पत्र व्हायरल होत आहे. (Asha Bhosle Letter Viral)
"मला 90 वर्षांपर्यंत जिवंत ठेवणाऱ्या माझ्या रसिक बंधू-भगिनींना माझा सप्रेम नमस्कार. तुम्ही नसता तर कुणीच कलाकार झाले नसते. पण तुम्ही मला 80 वर्ष सातत्याने प्रेम केलंत. माझ्या जीवनात कष्ट बघून तुम्ही मला तुमच्या घरातली एक सदस्य मानता. धन्यवाद हा शब्द फार छोटा आहे. मला असंच प्रेम देत रहा. तुमचीच, आशा भोसले." असं आशा भोसले यांनी या पत्रात म्हटलं आहे.

स्वरस्वामिनी आशा या पुस्तकात आशा भोसले मी स्वतःच्या हस्ताक्षरात रस्तिक प्रेक्षकांप्रति कृतज्ञता व्यक्त केली आहे. या पुस्तकातील आशा भोसले यांचे हे पत्र सध्या चर्चेत आहे. 'स्वरस्वामिनी आशा' या पुस्तकाचे प्रकाशन विले पार्त्यातील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते झाले होते. हे पुस्तक मंजिरी हेटे याचं आहे. या कार्यक्रमात आशाताईंच्या उस्फूर्त, निरागस, निखळ, अवखळ आणि उत्कट स्वभावाचे दर्शनही रसिकांना झाले होते.
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनी गेल्या आठ दशकांपासून मराठी हिंदी इंडस्ट्रीसाठी नवनवीन गाणी गायली. गझल अभंग भूपाळी पासून थेट तरुणांच्या मनाला भिडणारी गाणी देणाऱ्या दिग्गज गायिकेने एका पॉडकास्टमध्ये त्यांची अखेरची इच्छा व्यक्त केली होती. आपल्या कलेवर गाण्यावर नितांत प्रेम असणाऱ्या आशाजींना कलयत मग्न असतानाच आपला अखेरचा प्रवास सुरू करावा अशी मनोमन इच्छा होती. माझा देवाकडे एकच मागणं आहे, मी गात असतानाच मला मरण यावं.. बस्स.. हीच माझी मनापासून इच्छा आहे. आता माझ्यासाठी शिकण्यासारखं काहीच उरलं नाही. आता आणखी काय शिकायचं बाकी आहे? गाणं हेच माझे आयुष्य आहे. अशा आशयाची कमेंट सध्या सोशल मीडियावरही व्हायरल होत होती.