Asha Bhosle Movie: गायिकाच नव्हे अभिनेत्रीही, 79 व्या वर्षी केलं डेब्यू; आशा भोसलेंचा हा चित्रपट पाहिलाय का ? डोळ्यांत येईल पाणी
Tv9 Marathi April 13, 2026 04:45 PM

Asha Bhosle Acting Debut Movie : हजारो वैविध्यपूर्ण गाणी गाऊन, तितक्यात ताकदीने पेलून दाखवणारी सुरांची सम्राज्ञी.. अर्थात तुमच्या आमच्या सर्वांच्या लाडक्या गायिक आशा भोसले(Asha Bhosle). 92 व्या वर्षी काल (12 एप्रिल) त्यांनी या जगाला अलविदा केलं. ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या एक अशा गायिका होत्या, ज्यांनी संगीत क्षेत्रात अनेक दशकं अविरत काम करून 12 हजारांपेक्षा अधिक गाणी गायली होती. त्यांचा आवाज आणि त्यांच्य गाण्याचा चाहता नाही असा माणूस विरळाच. पण हजारो गाणी गाणाऱ्या आशा भोसले या एक अभिनेत्रीही होत्या, हे तुम्हाला माहीत आहे का ?

हो, हे खरं आहे. आशा भोसले यांनी वयाच्या 79 व्या वर्षी अभिनेत्री म्हणून पदार्पण केलं, त्यांनी चक्क एका चित्रपटात काम केलं होतं. 2013 साली आलेल्या ‘माई’ नावाच्या फॅमिली ड्रामामध्ये आशा भोसले यांनी अभिनय केला. अभिनेत्री म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट होता. या चित्रपटात त्यांची प्रमुख भूमिका होती. लीड ॲक्ट्रेस म्हणून हा त्यांचा पहिलाच चित्रपट असला तरी त्यांनी इतकं सुरेख काम केलं होतं की पहिल्यांदा क2णेरा फेस करून काम करतायत असं कोणालाच वाटलं नाही. त्यांच्या उत्तम अभिनयाने सर्वांना खिळवून ठेवलं आणि लोकांचं मनही जिंकून घेतलं. त्यांच्या अभिनयाचे खूप कौतुक झालं.

आशा भोसले यांची भूमिका आणि चित्रपटाची कहाणी

‘माई’ या चित्रपटात आशा भोसलेंची भूमिका इतकी हृदयस्पर्शी होती की सर्वजण भावूक झाले, त्यांचं काम पाहून प्रेक्षकांच्या डोळ्यात अश्रू आले. या चित्रपटात आशा भोसले यांनी अल्झायमर आजाराने ग्रस्त असलेल्या एका वृद्ध महिलेची भूमिका साकारली होती. तिची स्मरणशक्ती हळूहळू कमी होत असते, तिचे पती जगात नाहीत. आणि ज्या वयात मुलांनी आईचा आधार बनायला पाहिजे, त्याच वयात तिची मुलं त्यांना सोडून जातात.

पद्मिनी कोल्हापूरेनेही केलं होतं चित्रपटात काम

अशा वेळी फक्त तिची मुलगीच तिच्या पाठीशी उभी राहते. पद्मिनी कोल्हापुरीने तिच्या मुलीची भूमिका साकारली होती. आपल्या आईला पाठिंबा देण्यासाठी, पद्मिनी कोल्हापुरे हिच्या पात्राला स्वतःच्याच कुटुंबाच्या विरोधात जावं लागतं. हळूहळू तिची आई तिला ओळखेनाशी होते, पण तरीही ती आपल्या भूमिकेवर ठाम राहते. या चित्रपटाने लोकांच्या मनाला स्पर्श केला, सगळ्यांना तो अतिशय आवडला.

10 व्या वर्षी गायलं गाणं

आशा भोसले अघ्या 9 वर्षांच्या होत्या, तेव्हा त्यांच्या वडिलांचं निधन झालं आणि कुटुंबावर दु:खाचं आभाळ कोसळलं. वडिलांच्या निधनानंतर, कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आशा भोसले यांनी, त्यांची बहीण, विख्यात गायिका लता मंगेशकर यांच्यासोबत गाण्यास सुरुवात केली. वयाच्या 10 व्या वर्षी, आशा भोसले १९४३ च्या ‘माझा बाळा’ या मराठी चित्रपटातील ‘चला चला नव बाळा’ हे गाणं पहिल्यांदा गायलं. तेव्हापासून त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य संगीत क्षेत्राला समर्पित केलं . त्यांच्या जाणायाने आज प्रत्येक रसिक हळहळला आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.