सध्याच्या हवामान स्थितीनुसार विदर्भ आणि मराठवाड्यात उन्हाचा कडाका प्रचंड वाढला आहे. चंद्रपूर, ब्रह्मपुरी, अकोला आणि वर्धा यांसारख्या शहरांमध्ये तापमान ४२°C ते ४४°C च्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.
ALSO READ: टीसीएस लैंगिक छळ प्रकरणात मोठी कारवाई, आठ आरोपी कर्मचारी निलंबित
हवामान विभागाने विदर्भातील नागरिकांना दुपारच्या वेळी बाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. लातूर, धाराशिव आणि नांदेड जिल्ह्यांतही कोरड्या हवामानामुळे उष्णतेची तीव्र लाट जाणवत आहे.ALSO READ: केयरटेकरच्या तोंडात कोंबला बोळा तर सुरक्षा रक्षकाला चावा; पुणे रेस्क्यू सेंटर मधून १३ बांगलादेशी महिला फरार
हवामान विभागान दिलेल्या इशाऱ्यानुसार, या उष्णतेच्या लाटेचा सर्वाधिक फटका चंद्रपूर, अकोला, ब्रह्मपुरी, नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यांना बसू शकतो. तसेच लातूर, जालना, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरचा काही भाग देखील उष्ण राहू शकतो. अशा परिस्थितीत स्वतःची काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.ALSO READ: हवामान विभागाने देशातील चार राज्यांमध्ये वादळीवाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा जारी केला
Edited By- Dhanashri Naik