इलेक्ट्रीक टु-व्हीलर सेगमेंटची प्रमुख कंपनी असलेल्या ओला इलेक्ट्रीकने सोमवारी 13 एप्रिल रोजी आपली नवीन हाय रेंज इलेक्ट्रीक स्कूटर S1 X+ 5.2 kWh लाँच केली आहे. या स्कूटरची स्वागताची किंमत 1,29,999 रुपये ठेवली आहे. ही किंमत 15 एप्रिल 2026 पर्यंतच राहणार आहे. ही स्कूटरची ओलाच्या स्वदेशी 4680 ‘Bharat Cell’ बॅटरी तंत्राने सुसज्ज आहे. पहिल्यांदा या एडव्हान्स बॅटरी टेक्नॉलॉजीला मोठ्या प्रमाणात सर्वसामान्य ग्राहकांपर्यंत पोहचले जात आहे, आधी हे तंत्रज्ञान केवळ प्रीमीयम मॉडेल्सपर्यंतच मर्यादित होते.
मोटर: 11 kW मिड-ड्राईव्ह मोटर (इंटीग्रेटेड MCU सोबत )
रेंज: 320 किलोमीटर (IDC)
टॉप स्पीड: 125 किमी/तास
ब्रेकिंग: ब्रेक-बाय-वायर सिस्टीम आणि फ्रंट डिस्क ब्रेक
ओला इलेक्ट्रीकने या लाँच सोबत आपल्या व्हर्टिकल इंटेग्रेशन मॉडेलला आणखीन मजबूत केले आहे. ज्यात बॅटरी सेल डेव्हलमेंट, बॅटरी पॅक डिझाईन आणि वाहन मॅन्युफॅक्चरिंगला पूर्णपणे इन – हाऊस केले जाते. आणि या नव्या तंत्रज्ञानाला वेगाने बाजारापर्यंत पोहचवणे शक्य होते. ओला इलेक्ट्रीकने अलिकडेच आपल्या इन-हाऊस डेव्हलप केलेल्या लिथियम आयर्न फॉस्फेट (LFP) सेलच्या तयार होण्याची घोषणा केली आहे. इलेक्ट्रीक मोबिलिटीला वेगवान करणे आणि एक फुल-स्टॅक एनर्जी इकोसिस्टीम बनवण्याच्या ओलाच्या मोहिमेचा एक महत्वाचा पल्ला आहे. कंपनीला आज सादर केलेल्या या स्कूटरपासून खूप अपेक्षा आहेत. कंपनीच्या तिच्या पुढील योजनेवर सातत्याने काम करत आहे.
ओलाच्या सध्या पोर्टफोलियोत प्रीमियम सेगमेंट – S1 Pro+ (5.2 kWh & 4 kWh), S1 Pro (4 kWh & 3 kWh) उपलब्ध आहेत. मास मार्केटमध्ये S1 X+ (5.2 kWh नवीन व्हेरिएंट), S1 X (2, 3 & 4 kWh) आहे. मोटर सायकलमध्ये Roadster X+ (4.5 & 9.1 kWh) आणि Roadster X (2.5, 3.5 & 4.5 kWh) हे मॉडेल आहेत. कंपनीने काही दिवसांपूर्वीच तिची फ्लॅगशिप इलेक्ट्रीक मोटरसायकल Roadster X+ 9 वर 60,000 रुपयांच्या सूटची घोषणा केली होती. ही 1 kWh ची मोटर सायकल याच्या 4680 Bharat Cell द्वारा संचालित आहे. Roadster 9.1 kWh ची किंमत आता 1,29,999 आहे. जी आधी 1,89,999 रुपये होती.