लिंगपिसाट खरातला 1825 बड्या असामींचे कॉल, नावं ऐकून हादराच बसेल; दोन दिवसात होणार सर्वात मोठा धमाका
Tv9 Marathi April 13, 2026 07:45 PM

भोंदूबाबा लिंगपिसाट अशोककुमार खरात याचे अनेक कारनामे समोर आल्याने महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देश हादरून गेला आहे. असंख्य महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याची माहिती उघड होताच देशात धरणीकंप आला आहे. अशोक खरात दैवी शक्ती असल्याचं कारण दाखवून अनेकांना गंडवत होता. त्यात अनेक बड्या असामी आहेत. राजकारण्यांपासून अधिकाऱ्यांपर्यंत ते पोलिसांपर्यंत अनेकजण त्याच्या भक्तप्रपंचात होते. तब्बल 1825 लोक त्याच्या संपर्कात होते. त्यात बड्या असामी आहेत. ही नावे समोर आल्यावर देशात एकच खळबळ उडाली आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तसा दावा केला असून त्या येत्या बुधवारी या सर्वांचा भांडाफोड करणार आहे.

अंजली दमानिया यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली आहे. येत्या बुधवारी मी पत्रकार परिषद घेणार आहे. त्यात अशोक खरातचे सर्व कारनामे सांगणार आहे. आताच्या घटकेला माझ्याकडे जी माहिती आणि एक्सेलशीट आहे, त्यात एकूण 1825 नंबर आहेत. ज्यांनी अशोक खरातला कॉल केले आणि अशोक खरातने ज्यांना फोन केले अशा लोकांचे हे नंबर आहेत. या सगळ्या नंबर्समध्ये धक्कादायक बाब म्हणजे त्याच्यात आयजी लेव्हलचे अधिकारी, पीआय, सीनियर पीआय, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर आणि इतकंच नाही तर राजकारण्यांचाही समावेश आहे. नावे ऐकून तुम्हाला धक्का बसेल असे राजकारणी त्याच्यात आहे, असा दावा अंजली दमानिया यांनी केला.

बुधवारी खुलासा करणार

या व्यक्तीची ख्याती किती मोठी आहे हे खरच कळत नाही. कारण यात ट्रॅफिक हवालदारापासून पोलीस ठाण्यातील असंख्य अधिकारी सामील आहेत. ही संपूर्ण माहिती मी आता पोलीस अधिकाऱ्यांना पाठवली आहे. पण बुधवारी याचा खुलासा मी नक्की करणार आहे, असं दमानिया यांनी सांगितलं.

सर्व व्यवहार एसएमएसवर

पोलिसांकडून आज प्रतिभा चाकणकरांची चौकशी होत आहे. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिाय व्यक्त केली. असंख्य खुलासे होतील आणि स्पेशली आज प्रतिभा चाकणकर या देखील शिर्डी पोलीस स्टेशनला चौकशीला गेल्या आहेत. त्यांची जी माहिती होती की आफाट आहे. त्यांचे कॉल्स कमी होते, पण त्याचे एसएमएस प्रचंड प्रमाणावर होते. म्हणजे हे सगळे व्यवहाराचे मेसेजेस होते. काही महत्त्वाच्या डिटेल्स मी शिर्डी पोलीस स्टेशनला माझ्याकडून पाठवल्या आहेत, असंही त्यांनी म्हणाल्या.

अतिशय धक्का बसतो

ईडीने आज खरातच्या ठिकाण्यांवर छापेमारी केली. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. ईडीची 11 ठिकाणी चौकशी चालू आहे. रोज नवीन खुलासे होत आहेत. हे बघून अतिशय धक्का बसतो, असंही त्यांनी सांगितलं.

खुलासा करणार

अशोक खरातचा ठाण्याशी संबंध असल्याचा दावाही त्यांनी केला. मी याबाबतचा खुलासा गुगल मॅपसह बुधवारी करणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.