Father Kills Son : सांगलीत मनोरुग्ण मुलाच्या डोक्यात बापाने घातला दगड; सततच्या त्रासाला कंटाळून केलं कृत्य, कासेगाव पोलिसांत गुन्हा
esakal April 13, 2026 12:45 PM

नेर्ले (सांगली) : वाटेगाव (ता. वाळवा) येथील वडिलाने राहत्या घरी मनोरुग्ण मुलाच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून (father kills mentally ill son in Sangli) केल्याची घटना घडली. मनोरुग्ण मुलाच्या सततच्या होणाऱ्या त्रासाला कंटाळून त्याच्या डोक्यात पहाटे दगड घातल्याने घटनास्थळी लोकांनी गर्दी केली होती. अरुण यशवंत यादव (वय ६५, रा. वाटेगाव ता. वाळवा) असे खून केलेल्या वडिलांचे नाव आहे, तर निखिल अरुण यादव (३१) असे खून झालेल्या मुलाचे नाव आहे.

काल पहाटे चारच्या सुमारास मनोरुग्ण मुलाच्या डोक्यात दगड घालून यादव याने खून केल्याची माहिती पोलिसांना दिली. याबाबत मुलाची आई सुलभा अरुण यादव (वाटेगाव, ता. वाळवा) यांनी कासेगाव पोलिसांत फिर्याद दिली. अरुण यादव यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मृत निखिल यादव हा आई-वडिलांना गेली दोन वर्षांपासून मानसिक व शारीरिक त्रास देत होता.

कोणतातरी वाद घालून तो भांडण करीत असे. शनिवारी रात्री निखिल आणि वडील अरुण यादव यांचे भांडण झाले. मनोरुग्ण असल्याने त्याला कित्येक वेळा सांगून समजवून घेतले तरी त्याचा त्रास वाढतच होता. निखिलवर ईश्वरपूर येथे उपचार सुरू होते. मनोरुग्ण असलेल्या पोटच्या मुलाचा सततचा त्रास सहन न झाल्याने रविवारी पहाटे चार वाजता कंटाळून वडिलांनी निखिलच्या डोक्यात दगड घालून त्याला संपवले.

Sangli Bribery Case : पती शिक्षक, पत्नी सरपंच; दोघांनाही 35 हजारांची लाच भोवली! ACB च्या कारवाईनंतर सांगली जिल्हा परिषद ॲक्शन मोडमध्ये...

खून झाल्याची माहिती मिळताच कासेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिश्चंद्र गावडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिस उपाधीक्षक अरुण पाटील यांनी भेट दिली. पोलिसपाटील नेमिनाथ खोत यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. निखिल यादव याचा मृतदेह उत्तरीय चाचणीसाठी उपजिल्हा रुग्णलयात ईश्वरपूरला पाठवण्यात आला. कासेगाव पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरिचंद्र गावडे अधिक तपास करीत आहेत.

Kolhapur CPR Red Diary Case : कोल्हापुरात आरोग्य विभागात खळबळ! CPR 'लाल डायरी' प्रकरणी मोठी कारवाई; डॉ. वाडीकरांसह डॉ. सुप्रिया देशमुख यांचे निलंबन आई-वडिलांची परवड...

आई सुलभा या अंगणवाडीत काम करतात. मनोरुग्ण निखिल हा सातत्याने आई-वडील यांना त्रास देत होता. आज वडिलांना त्रास सहन झाला नाही. त्यांनी पोटच्या मुलाच्या डोक्यात दगड घालून त्याला संपवले. या घटनेत मुलाचा मृत्यू झाला. आई घरी एकटी पडली आणि वडिलांना तुरुंगात जावे लागले. घटनेमुळे कुटुंब उद्ध्वस्त झाले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.