घर पाहण्यासाठी गेलेल्या मामा-भाच्याचा डंपरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना ईस्टर्न एक्सप्रेस वेवर घडलीय. डंपरने धडक दिल्यानंतर दुचाकीवरील दोघांनाही चिरडलं. यात दोघांचा जागीच मृत्यू झाला. मृत्यू झालेले दोघे साकिनाक्याला राहत होते. ते कल्याणला घर पाहण्यासाठी गेले असताना विक्रोळीजवळ त्यांचा अपघात झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, ईस्टर्न एक्सप्रेस वेवर रविवारी भीषण अपघात झाला. डंपरने दुचाकीला जोराची धडक दिली. त्यानंतर डंपरच्या चाकाखाली चिरडल्यानं दोघांचा मृत्यू झाला. भीमाशंकर गोपाल यादव आणि रामनारायण संताप्रसाद यादव अशी मृतांची नावे आहेत. या अपघात प्रकरणी ज्ञानेश्वर विष्णू गायकवाड याला विक्रोळी पोलिसांनी अटक केलीय.
पंढरपुरात तरुणीवर अॅसिड हल्ला, ICUमध्ये उपचार सुरू; आई म्हणाली, माझ्या लेकीवर हल्ला झाला तसा कुणावर करू नकाईस्टर्न एक्सप्रेस वेवर हा अपघात नेमका कसा झाला याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिसांनी डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिक तपास कऱण्यात येत आहे. दरम्यान, पुन्हा एकदा अवजड वाहनांच्या वाहतुकीचा मुद्दा समोर येत आहे.
तरुण-तरुणीचा अपघाता मृत्यू
मुरबाड-माळशेज घाट रस्त्यावर सरळगावजवळील लीहे पाडा येथे एका डम्परने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक तरुण व तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. ११) घडली, तर आणखी एक तरुणी जखमी झाली आहे. तिघेही दुचाकीने हळदीच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. याप्रकरणी डम्परचालकास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. साक्षी लीलाधर पवार (वय २१) रा. बळेगाव, नितीन नामदेव शिरोशे (वय २५) रा. शिरोसे पाडा अशी मृत तरुण-तरुणीची नावे आहेत. त्यांच्यावर रविवारी (ता. १२) सकाळी बळेगाव व शिरोशे पाडा या गावी अंत्यसंस्कार करण्यात आले.