रुपाली चाकणकरांची बहीण चौकशीसाठी शिर्डी पोलीस ठाण्यात पोहोचली, अशोक खरातविषयी काय बोलणार?
नितीन ओझा, एबीपी माझा April 13, 2026 01:13 PM

Ashok Kharat and Rupali Chakankar: नाशिकचा भोंदू बाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या काळ्या साम्राज्याचे धागेदोरे आता राजकीय वर्तुळातील नातेसंबंधांपर्यंत पोहोचले आहेत. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्या बहीण प्रतिभा चाकणकर (Pratibha Chakankar) आज शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) चौकशीसाठी हजर झाल्या आहेत. समता पतसंस्थेतील संशयास्पद कोट्यवधींच्या व्यवहाराप्रकरणी पोलिसांनी त्यांना नोटीस बजावली होती.

Ashok Kharat and Rupali Chakankar: नेमके प्रकरण काय?

अशोक खरात विरोधात शिर्डीत बेकायदेशीर सावकारी आणि फसवणुकीचे गुन्हे दाखल आहेत. तपासादरम्यान पोलिसांना 'समता पतसंस्थेत' खरातशी संबंधित अशी 132 संशयास्पद खाती आढळली आहेत, ज्यामध्ये खरात हा 'नॉमिनी' (वारसदार) आहे. धक्कादायक बाब म्हणजे, यातील 4 खाती प्रतिभा चाकणकर आणि त्यांच्या मुलांच्या नावे आहेत.

Pratibha Chakankar: 2 कोटी 40 लाखांचा संशयास्पद व्यवहार

पोलीस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, प्रतिभा चाकणकर यांच्या नावे 2 खाती आहेत. त्यांच्या मुलांच्या नावे 2 खाती आहेत. या चारही खात्यांवरून एकूण 2 कोटी 40 लाख रुपयांचे मोठे व्यवहार झाले आहेत. या पैशांचा स्रोत काय? हे पैसे खरातच्या सावकारी व्यवसायाशी संबंधित आहेत का? आणि या व्यवहारांमागे खरातचा नेमका हेतू काय होता? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी शिर्डी पोलिसांनी चाकणकर यांचा जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे.

Ashok Kharat and Rupali Chakankar: राजकीय वर्तुळात खळबळ

यापूर्वीच अशोक खरातशी असलेल्या संबंधांच्या आरोपावरून रुपाली चाकणकर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. आता त्यांच्या सख्ख्या बहिणीचीच पोलीस चौकशी सुरू झाल्याने या प्रकरणाला मोठे राजकीय वळण मिळाले आहे. शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर यांच्या दोन पत्त्यांवर नोटीस धाडली होती, त्यानंतर त्या आज चौकशीसाठी हजर झाल्या आहेत.

Pratibha Chakankar: अशोक खरातविषयी काय बोलणार?

पोलिसांनी आतापर्यंत या प्रकरणाशी संबंधित 33 खातेदारांचे जबाब नोंदवले आहेत. मात्र, चाकणकर कुटुंबाशी संबंधित असलेल्या या खात्यांमधील मोठी रक्कम पाहता, प्रतिभा चाकणकर यांचा जबाब या संपूर्ण तपासातील सर्वात महत्त्वाचा दुवा मानला जात आहे. प्रतिभा चाकणकर काय जबाब नोंदवणार? अशोक खरातविषयी काय बोलणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

आणखी वाचा 

Ashok Kharat Crime news: अशोक खरातचं जेवण कमी झालं, बायकोचा पत्ता विचारताच म्हणाला, 'देवाला माहिती...'

Ashok Kharat Case Nashik Crime News: ईशानेश्वर मंदिर, कार्यालय ते फार्महाऊस... अशोक खरातच्या मालमत्तांची ED कडून झाडाझडती, आज पुन्हा कोर्टात हजर करणार

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.