Nashik Crime News : नाशिकमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. विल्होळी परिसरात महिलेकडून एका व्यक्तीची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. एक महिला हातात कोयता घेऊन हत्या करत असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हत्येचे कारण अस्पष्ट आहे. या प्रकरणाची दखल घेत पोलिसांनी तातडीने तपास रसुरु केला आहे.
नाशिकच्या विल्होळी परिसरात महिलेने एका व्यक्तीच्या डोक्यात कोयत्याने सपासप वार केले आहेत. कोयत्याने वार करतानाचा गंभीर व्हिडिओ समोर आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी अधिकचा तपास सुरु केला आहे. कोयत्याने वार केल्यानंतर महिलेने एका व्यक्तिसोबत दुचाकीवर पलायन केले. ओळख पटू नये म्हणून पलायन करताना दुचाकीच्या नंबर प्लेट कपड्याने झाकली होती. हत्या का केली याचे कारण अस्पष्ट असून पोलिसांकडून घटनास्थळी तपास सुरु केला आहे. नाशिकच्या ग्रामीण पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरु आहे.
गडचिरोली जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. गडचिरोलीच्या आरमोरी तालुक्यातील पालोरा गावात कौटुंबिक वादातून मुलाने थेट वडीलांनांचं संपवल्याची घटना समोर आली आहे. स्वतःच्या वडिलांवर कुऱ्हाडीने वार करून मुलाने निर्घृण हत्या केली आहे. देवाजी धकाते (65) असे मृतक वडिलांचे नाव असून योगेश धकाते (25) आरोपी मुलाचे नाव आहे.
वडील रात्री वीटभट्टीवरून घरी परतत असताना लपून बसलेल्या योगेशने त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. फोनवर बोलत असलेल्या मुलीने वडिलांचा शेवटचा आक्रोश ऐकला. कौटुंबिक वाद, पत्नीसोबतचे मतभेद आणि राग यामुळे योगेशने हा टोकाचा निर्णय घेतल्याची प्राथमिक माहिती पोलिसांकडून समोर आली आहे. हत्या केल्यानंतर आरोपीने घरात जाऊन कुऱ्हाड लपवली आणि वडिलांना शोधण्याचे नाटकही केलं. मात्र पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने खुनाची कबुली दिली. पोलीसांनी आरोपी योगेश धकाते याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर पंचायत समिती कार्यालयात माहिती अधिकार कार्यकर्त्याने राडा घातल्याची घटना घडली आहे. पंचायत समितीच्या पाणी पुरवठा विभागातील अधिकारी अनुप पाटील यांची महिलेने गळपट्टी धरून केली शिवीगाळ केली आहे. गर्जना ग्रुपच्या दीपाली खारगे आणि प्रवीण भालेराव यांनी करवीर पंचायत समितीत अधिकाऱ्यांना शिवीगाळ करत धमकावले. करवीर पंचायत समितीत तणाव निर्माण झाल्याने सर्व अधिकारी आणि कर्मचारी पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहेत. लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशन परिसरात करवीर पंचायत समिती अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची गर्दी आहे. अधिकाऱ्यांना धमकावणाऱ्या महिलेवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.