पुणे: शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसावा, यासाठी दहा सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून दीर्घ कालावधीसाठी तडीपार करण्यात आले आहे. तर, इतर १३५ गुन्हेगारांवर तीन दिवसांसाठी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. पोलिस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.
Secondary Education: माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय! ३८२ शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रोखणार; नेमकं काय कारण?परिमंडळ सातच्या कार्यक्षेत्रातील विमानतळ, चंदननगर, वाघोली आणि लोणीकंद पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ही विशेष मोहीम राबवण्यात आली. गंभीर गुन्हे दाखल असलेल्या दहा सराईत गुन्हेगारांना जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. तर, शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे, तसेच अवैध दारू आणि अमली पदार्थांची बेकायदेशीर विक्री करणाऱ्या १३५ गुन्हेगारांवर तीन दिवसांची तडीपारीची कारवाई करण्यात आली.
पुणे जिल्ह्यातून तडीपार केलेल्या गुन्हेगारांमध्ये अभिजीत संजय जाधव (वय २९, रा. वडगावशेरी), साईनाथ ऊर्फ कडूबापू विठ्ठल पाटोळे (वय २७, रा. विमाननगर), अविनाश मुरलीधर मेटे (वय ३६, रा. वडगावशेरी), गगन तानाजी शिंदे (वय २४, रा. वडगावशेरी), संकेत अमोल बांदल (वय २७, रा. वडगावशेरी), मच्छिंद्र शंकर पवार (वय ३८, रा. लोणीकंद), सचिन भिमराव मातंग (वय २५, रा. वाघोली), आदित्य बापू शिंदे (वय २५, रा. वाघोली), बिरा रामदास श्रीराम (वय ३८, रा. भावडी, ता. हवेली), मालती संतोष मलके (वय ४५, रा. पेरणेफाटा, ता. हवेली) यांचा समावेश आहे. यापैकी कोणीही पुणे जिल्ह्यात आढळून आल्यास नागरिकांनी ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलिस उपायुक्त मुंडे यांनी केले आहे.
Maratha Coins Discovery: मराठाकालीन दुर्मीळ नाणी सापडली; संगमनेर तालुक्यातील निमगावजाळीत ऐतिहासिक ठेवा, ‘छत्रपती’ असा उल्लेख.. आणखी शंभर जणांवर कारवाईचा बडगा-परिमंडळ सातच्या हद्दीतील इतर गुन्हेगारांच्या हालचालींवर पोलिसांचे बारकाईने लक्ष आहे. लवकरच आणखी शंभरहून अधिक गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिनांनी दिली.