पुणे : कामाच्या ठिकाणी महिलांचे सक्तीने धर्मांतर आणि लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार नाशिक शहरात उघडकीस आला आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, असे निर्देश विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नाशिक पोलिस आयुक्तांना दिले आहेत.
Secondary Education: माध्यमिक शिक्षण विभागाचा निर्णय! ३८२ शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे पगार रोखणार; नेमकं काय कारण?या प्रकरणामुळे समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, सामाजिक सलोखा, महिलांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि इतर संबंधितांचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही, मोबाईल चॅट्स व आर्थिक व्यवहारांसारख्या तांत्रिक पुराव्यांची कसून तपासणी करावी.
हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून पीडित महिलांना तत्काळ पोलिस संरक्षण, मोफत कायदेशीर मदत आणि समुपदेशन उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी डॉ. गोऱ्हे यांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात कठोर पावले उचलावीत.
MPSC Success Story: वडिलांच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून गाठले यशाचे शिखर; विक्रम पाडळेची कर सहाय्यकपदी निवड, अंत्यविधी दिवशीच एमपीएससीची परीक्षा!महिलांचे शोषण रोखण्यासाठी आयटी आणि सर्व खासगी कंपन्यांनी ‘अंतर्गत तक्रार समित्या’ प्रभावीपणे राबवाव्यात. याशिवाय, कार्यालयांचे नियमित सुरक्षा ऑडिट आणि अचानक तपासण्या कराव्यात. धर्मांतराच्या बेकायदेशीर प्रकारांवर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष यंत्रणा उभारावी, अशा महत्त्वपूर्ण सूचनाही त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.