CSK vs KKR Live Streaming : चेन्नई-केकेआरमध्ये 2 गुणांसाठी टफ फाईट, सामना किती वाजता?
GH News April 14, 2026 02:17 AM

आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 22 व्या सामन्यात 2 चॅम्पियन्स संघ आमनेसामने असणार आहेत. चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात हा सामना होणार आहे. दोन्ही संघांना या मोसमात लौकीकाला शोभणारी कामगिरी करता आलेली नाही. चेन्नईला 4 पैकी फक्त एकाच सामन्यात विजय मिळवता आला आहे. तर दुसऱ्या बाजूला अजिंक्य रहाणे याच्या नेतृत्वातील कोलकाता नाईट रायडर्सला खेळलेल्या चारही सामन्यात पराभूत व्हावं लागलं आहे. त्यामुळे केकेआरसमोर पाचव्या सामन्यात विजयाचं खातं उघडण्याचं आव्हान असणार आहे. तर दुसर्‍या बाजूला चेन्नईचा विजयी ट्रॅकवर कायम राहण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना उभयसंघात 2 गुणांसाठी चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.