Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Marathi Update: चेन्नई सुपर किंग्सने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये सलग दुसऱ्या विजयाची नोंद केली. कोलकाता नाइट रायडर्सची पाचव्या सामन्यात विजयाची पाटी कोरीच राहिल्याने त्यांचा IPL 2026 मधील प्रवास खडतर झाला आहे. CSK घरच्या मैदानावरील सामन्यात तीन सोपे झेल टाकले, परंतु नूर अहमदने ( Noor Ahmad ) ४-०-२१-३ अशी अप्रतिम स्पेल टाकून KKR ला पूर्णपणे बॅकफूटवर ढकलले. १३ षटकांच्या आत सहा फलंदाज गमावल्यानंतर KKR ला पुनरागमन करणे अवघडच झाले होते. CSK ने विजय मिळवून IPL 2026 POINT TABLE मध्ये मुंबई इंडियन्सला मागे ढकलले आहे.
संजू, आयुष, ब्रेव्हिसची आक्रमकता पण...CSK ने आज मोठी धावसंख्या उभारण्याची संधी गमावली. ऋतुराज गायकवाड ( ७) अपयशी ठरला असला तरी संजू सॅमसन व आयुष म्हात्रे यांनी २२ चेंडूंत ४७ धावांची भागीदारी करून डावाला आकार दिला. पण, आयुष १७ चेंडूंत ३८ धावांवर माघारी परतला. संजू व डेवॉल्ड ब्रेव्हिस हे मैदानावर उभे होते, परंतु KKR च्या गोलंदाजांनी धावांचा वेग रोखून धरला होता. या दोघांना ३२ चेंडूंत ३९ धावा जोडता आल्या. संजू ३२ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ४८ धावांवर त्रिफळाचीत झाला.
ब्रेव्हिसने २९ चेंडूंत ४१ आणि सर्फराज खान १८ चेंडूंत २३ धावांवर बाद झाला. या दोघांनी २९ चेंडूंत ५१ धावांची भागीदारी केली. २१५ धावांपर्यंत पोहोचणारा चेन्नईचा संघ ५ बाद १९२ धावांपर्यंत अडखळला. सुनील नरीनने ४ षटकांत २१ धावा देत १ विकेट घेतली. अनुकुल रॉय ( ३-०-२१-१) व कार्तिक त्यागी ( ४-०-३५-२) यांच्यासह वरुण चक्रवर्थीने ( ३-०-२६-०) चांगली गोलंदाजी केली. चेन्नईच्या डावात एकही अर्धशतक न होता ही दुसरी सर्वोत्तम धावसंख्या आहे. २०१२ मध्ये डेक्कन चार्जर्सविरुद्ध त्यांनी ६ बाद १९३ धावा केल्या.
IPL चे सामने ऑस्ट्रेलियात अन् BBL ची मॅच चेन्नईत! क्रिकेट चाहत्यांसाठी खूप मोठी बातमी; पडद्यामागे बऱ्याच हालचाली, BCCI... कोलकाताच्या गोलंदाजांचे पुनरागमन...चेन्नईने पहिल्या ६ षटकांत १२ च्या सरासरीने धावा केल्या, तेच ७ ते १५ षटकांत हा रन रेट ७.७७ इतका कमी झाला आणि शेवटच्या ५ षटकांत त्यांना ५० धावा करता आल्या. फिरकीपटूंविरुद्ध त्यांनी १० षटकांत ६८ धावा केल्या आणि दोन विकेट्स गमावल्या. KKR ने आणखी एक अनपेक्षित चाल खेळली आणि सुनील नरीन व फिल अॅलन ही जोडी सलामीला आली. अजिंक्यने स्वतःला तिसऱ्या क्रमांकावर मागे ढकलले. फिन ( १) अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर बाद झाला.
नरीनने चांगली फटकेबाजी केली आणि चौथ्या षटकात ऋतुराजने त्याला सोपा झेल टाकला. पण, पुढच्याच षटका खलील अहमदने दुसऱ्या स्लीपमध्ये नरीनला ( २४ धावा, १७ चेंडू) झेल देण्यास भाग पाडले. CSK ने पॉवर प्लेमध्ये ७२ धावांत दोन विकेट्स गमावल्या होत्या, तेच KKR ला २ बाद ३६ धावा करता आल्या. चेन्नईच्या गोलंदाजांनीही टिच्चून मारा केला. आठव्या षटकात अंगकृश रघुवंशीने उत्तुंग फटका मारलेला आणि डेवॉल्डने जीवतोडून प्रयत्न केला, परंतु चेंडू हाताला लागून सीमापार गेला.
मोठी बातमी : KKR च्या गोलंदाजावर दोन वर्षांची बंदी! IPL 2026 मध्ये खेळण्याची मिळाली शिक्षा, पाकिस्तानात जल्लोष नूर अहमदने मॅच फिरवली..गुरजपनीत सिंगच्या पहिल्याच षटकात अजिंक्यने उत्तुंग फटके खेचून CSKच्या गोलंदाजावर दडपण निर्माण केले. त्या षटकात १८ धावा KKR ने जोडल्या. अजिंक्यचा झेल घेण्याची संधी यावेळी सर्फराज खानने गमावली आणि या सामन्यातील हा तिसरा झेल CSK च्या खेळाडूंनी टाकला. पण, पुढच्या चेंडूवर अंगकृशचा ( २७) झेल घेऊन ब्रेव्हिसने CSK ला मोठा दिलासा दिला. अजिंक्यसोबत त्याची ५० धावांची भागीदारी संपुष्टात आली. पुढच्याच षटकात नूर अहमदने KKR कॅप्टन अजिंक्यला ( २८) माघारी पाठवून ४ बाद ८५ धावा अशी अवस्था केली. मोठे फटके मारण्यासाठी राखून ठेवलेला कॅमेरून ग्रीन गोल्डन डकवर त्रिफळाचीत झाला.
नूरने त्याच्य पुढच्या षटकात रिंकू सिंगवर ( ६) दडपण वाढवून त्याला विकेट देण्यास भाग पाडले. त्याने ४ षटकांत २१ धावा देताना ३ विकेट्स घेतल्या आणि कोलकाताला शेवटच्या ५ षटकांत ८७ धावा हव्या होत्या. रोव्हमन पॉवेल व रमनदीप सिंग हे दोन पॉवर हिटर अजूनही मैदानावर होते. या दोघांचे प्रयत्न सुरूच होते आणि १८ चेंडूंत अजूनही त्यांना ६२ धावा करायच्या होत्या. कंबोजने १८व्या षटकात फक्त ७ धावा दिल्या. ६ चेंडूंत ४५ धावा ज्या अशक्या होत्या आणि KKR चा पराभव निश्चित झाला. रमनदीप २३ चेंडूंत ३५ धावांवर झेलबाद झाला. KKR ला ७ बाद १६० धावा करता आल्या आणि चेन्नईने ३२ धावांनी हा सामना जिंकला.