27 Year Old Film Tridev Song Controvercy: 'धुरंधर 2'नं (Dhurandhar 2) बॉक्स ऑफिसवर (Dhurandhar 2 Box Office Collection) धुमाकूळ घालताय. 24 दिवसांत फिल्मनं भारतात 1050 कोटींहून अधिक कमाई केलीय. तर, वर्ल्डवाईड आकडा 1700 कोटींच्या पार पोहोचला आहे. या सिनेमात सर्वांच्याच अभिनयाचं कौतुक केलंय जातंय. सिनेमाचे संवाद, अॅक्शन सीन्स सारं काही प्रेक्षकांना आवडलंय. पण, या साऱ्यासोबतच 'धुरंधर 2' कॉन्ट्रोवर्सीच्या (Dhurandhar 2 Controvercy) जाळ्यातही अडकल्याचं पाहायला मिळतंय. काहीजण आदित्य धर (Aditya Dhar) दिग्दर्शित आणि रणवीर सिंह (Ranveer Singh) स्टारर सिनेमा प्रोपोगंडा असल्याचं म्हणत आहेत. तर, कुणी या सिनेमाची स्क्रिप्ट माझी होती, ती चोरलीय, असा आरोप लावलाय. अशातच आता 'धुरंधर 2'च्या दिग्दर्शकावर गाणी चोरल्याचा आरोप करण्यात आलाय.
हिंदी सिनेसृष्टीतला (Hindi Film Industry) 27 वर्षांपूर्वीचा सिनेमा 'त्रिदेव'मधलं (Tridev Movie Song) गाजलेलं गाणं 'तिरछी टोपीवाले' (Tirchhi Topiwale) 'धुरंधर 2'मध्ये वापरण्यात आलंय. आता या गाण्यावरुन आदित्य धर आणि 'धुरंधर 2'च्या अडचणी वाढणार की काय? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. 'धुरंधर 2'च्या निर्मात्यांविरुद्ध कथितरित्या अनधिकृत वापराच्याआरोपांवरुन एक खटला दाखल करण्यात आलेला. ज्यामुळे सिनेनिर्माते राजीव राय यांना एका अलिकडच्या मुलाखतीत या प्रकरणावर भाष्य करावं लागलंय.
'तिरछी टोपीवाले' आणि 'धुरंधर 2' सिनेमाचा वाद नेमता काय? असा प्रश्न जर तुम्हाला पडला असेल तर, राजीव काय यांनी 'त्रिदेव' या सिनेमाचं दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. आनंद बक्षी यांनी शब्दबद्ध केलेलं आणि कल्याणजी-आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं 'तिरछी टोपीवाले' हे गाणं मूळात याच सिनेमातलं आहे. नुकत्याच आलेल्या आणि बॉक्स ऑफिसवर हिट ठरलेल्या 'धुरंधर 2'मध्ये हे गाणं वापरण्यात आलंय. पण, आता 'धुरंधर 2'च्या टीमनं हे गाणं सिनेमात वापरताना कोणतीही पूर्वपरवानगी घेतलेली नव्हती, असा आरोप करण्यात आलाय.
कोणत्याही परवानगीशिवाय गाणं वापरल्यानं राजीव राय यांनी डीएनए इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलंय की, "ही चोरी आहे, हे पूर्णपणे चोरीच आहे... आणि तुम्ही हे दुसऱ्या सिनेमात टाकता, पूर्णपणे अल्टर करुन, तर मग ही डबल चोरी आहे. हे माझ्या दृष्टीनं चोरीच आहे. जेव्हा हे लोक कोर्टात जातील, त्यावेळी म्हणतील की, त्यांनी चोरी केलीच नाहीये... पण, ते कोर्टात यासाठी जातील कारण हा गुन्हा आहे... मला हे सिद्ध करावं लागेल की, ही चोरी आहे आणि असं करणं गुन्हा आहे... कोर्टाला निर्णय द्यावा लागेल की, मी बरोबर आहे की, चुकीचा..."
दिग्दर्शक राजीव राय पुढे बोलताना म्हणाले की, "ही माझी स्वतःची निर्मिती आहे, जिचा वापर 'धुरंधर' या सिनेमात करण्यात आला. त्यासाठी मला काही मिळालं का? तर नाही. त्यांनी माझे आभार मानले का? तर, नाही... त्यांनी माझी परवानगी घेतली का? नाही... माझ्या मते, हा निव्वळ चोरीचा प्रकार आहे आणि ही मंडळी चोर आहेत. हे गाणं तुम्ही रचलेलं नाही, तुम्ही ते रेकॉर्डही केलेलं नाही, मग तुम्ही ही मजल नक्की किती पुढे नेणार आहात? हे गाणे मी रचलंय. मी त्याची निर्मिती केली आणि मीच ते रेकॉर्ड केलंय. या संगीतासाठी मी आनंद बक्षी आणि विजू शाह यांना मानधन दिलं होतं. हे गाणं माझं आहे..."
1989 मध्ये त्रिदेव थिएटरमध्ये रिलीज झालेला. राजीव राय यांनी फिल्मचं दिग्दर्शनं केलेलं. तर, त्यांचे वडील गुलशन राय यांनी फिल्मची निर्मती केलेली. नसीरुद्दीन शाह, सनी देओल, जैकी श्रॉफ, माधुरी दीक्षित, सोनम, संगीता बिजलानी, अनुपम खेर आणि अमरीष पुरी या फिल्ममध्ये एकत्र दिसलेले. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. तर, या सिनेमाची गाणीही हिट होती.