आसू: फलटण शहरातील डॉ. आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात झाली. यावर्षी कोलंबिया विद्यापीठ येथील वाचनालयाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली. डॉ. बाबासाहेबांचा पुस्तक वाचन करत असलेला पुतळा आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. हा देखावा पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली.
MPSC Success Story: वडिलांच्या निधनाचे दु:ख बाजूला सारून गाठले यशाचे शिखर; विक्रम पाडळेची कर सहाय्यकपदी निवड, अंत्यविधी दिवशीच एमपीएससीची परीक्षा!जयंतीनिमित्त डॉ. आंबेडकर पुतळ्यास मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक- निंबाळकर, संजीवराजे नाईक- निंबाळकर, जिल्हा परिषद सदस्य सह्याद्री कदम, उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले, नगरसेवक सचिन अहिवळे, सुपर्णा अहिवळे, रूपाली सस्ते, प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर, तहसीलदार डॉ. अभिजित जाधव, पोलिस उपअधीक्षक विशाल खांबे, शहर पोलिस निरीक्षक अरविंद काळे आदींनी अभिवादन केले.
दरम्यान, काल (सोमवार) मध्यरात्री १२ वाजता डॉ. आंबेडकर चौकात भीमवंदनेसाठी फलटणसह तालुक्यातील हजारो भीमप्रेमींनी उपस्थिती लावली. सायंकाळी शहरातील प्रमुख व मार्गावरून फटाक्यांची आतषबाजी करत भव्य शोभायात्रा काढण्यात आली. पंचशील चौक, मंगळवार पेठ फलटण येथे गेली १५ दिवस प्रबोधनपर व्याख्याने, भीमगीतांचे कार्यक्रम आणि सामाजिक जनजागृती उपक्रम राबविण्यात आले.
पिंपरद (ता. फलटण) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती डीजे व फटाकेमुक्त साजरी करण्यात आली. या संकल्पनेतून खर्च टाळून त्या बचतीतून गरजू व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शालेय गणवेश व शैक्षणिक साहित्य देण्याचा उपक्रम राबविला. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीचा लवकरच गौरव करण्यात येणार असल्याची माहिती तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी दिली आहे.
Mumbai Pune Expressway: प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-पुणे ‘मिसिंग लिंक’ सज्ज; एक मेपासून मार्ग खुला होणार, बोगद्यांत ‘एआय’ सुरक्षाप्रणाली..डॉ. आंबेडकर सभागृहात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांच्या हस्ते झाले. यावेळी निवासी नायब तहसीलदार अभिजित सोनवणे, तुषार गुंजवटे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.