Quick and Easy Summer Breakfast Recipe: उन्हाळ्यात सकाळी हलकं, ताजं आणि शरीराला थंडावा देणारं काहीतरी खाणं खूप गरजेचं असतं. कडक उन्हात जड आणि तेलकट पदार्थ खाण्यापेक्षा हलका पण चविष्ट नाश्ता दिवसाची सुरुवात छान करतो. या ऋतूमध्ये मिळणारी फळंही खास असतात, विशेषतः आंबा आणि कैरी सगळ्यांनाच आवडतात.
जर तुम्हालाही नाश्त्याला काहीतरी हलकं आणि वेगळं खायचं असेल, तर नेहमीच्या नाश्त्याला थोडा ट्विस्ट देऊन तुम्ही आंबट-गोड चवीचा, पटकन तयार होणारा आणि पोटालाही हलका वाटणारा पदार्थ बनवू शकता, तो म्हणजे कैरी पोहे. कैरीचा ताजेपणा, पोह्यांची मऊ टेक्स्चर आणि फोडणीचा छान फ्लेवर हे सगळं मिळून तुमची सकाळ अगदी फ्रेश आणि रिफ्रेशिंग बनवते.
साहित्यपोहे – २ वाट्या (जाड, धुऊन निथळलेले)
कच्ची कैरी – १/२ वाटी (किसलेली)
कांदा – १ मध्यम (बारीक चिरलेला)
शेंगदाणे – २-३ टेबलस्पून (भाजलेले)
फोडणीसाठी – २ टेबलस्पून तेल, १ टीस्पून मोहरी, १ टीस्पून जिरे, ७-८ कढीपत्ता पाने
मसाले – १/२ टीस्पून हळद, २-३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
चवीनुसार – मीठ, १ टीस्पून साखर (ऐच्छिक)
सजावटीसाठी – कोथिंबीर
पोहे चाळणीत घेऊन हलक्या हाताने धुवा. ते मऊ होतील इतपत ओलसर ठेवा, जास्त भिजवू नका. बाजूला ठेवा.
कढईत तेल गरम करून त्यात मोहरी, जिरे आणि कढीपत्ता घाला. ते तडतडले की पुढची प्रक्रिया करा.
आता त्यात चिरलेला कांदा आणि हिरव्या मिरच्या घालून कांदा पारदर्शक होईपर्यंत परता.
किसलेली कैरी आणि हळद घालून १-२ मिनिटं परता, कैरी थोडी मऊ होऊ द्या.
आता पोहे, भाजलेले शेंगदाणे, मीठ आणि साखर घालून हलक्या हाताने मिक्स करा. झाकण ठेवून ३-४ मिनिटं मंद आचेवर वाफ येऊ द्या.
गॅस बंद करून वरून कोथिंबीर घालून गरमागरम सर्व्ह करा.
आंबट आणि कडक कैरी वापरल्यास चव उत्तम लागते.
पोहे भिजवू नका, फक्त धुवून घ्या म्हणजे ते हलके आणि मोकळे राहतात.
चव वाढवण्यासाठी ओला खोबरा किंवा उकडलेले बटाट्याचे तुकडेही घालू शकता.