एक विवाहित महिला आणि जीम ट्रेनरचं धक्कादायक प्रेम प्रकरण समोर आलं आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुस्लिम जीम ट्रेनर शब्बीर असगर ट्रंकवाला याला अटक केली आहे. गुजरातच्या सूरतमधील हे प्रकरण आहे. महिला एका प्रतिष्ठित हिंदू कुटुंबातून येते. सूरतच्या अब्जाधीश कुटुंबातून येणाऱ्या महिलेने सिटीलाइट भागात एक जीम लावली होती. तिथे ती नियमित व्यायामासाठी जायची. त्या ठिकाणी सब्बीर अजगर ट्रंकवाला हा जीम ट्रेनर म्हणून नोकरीला होता. त्याने गोड, गोड बोलून महिलेला प्रेमाच्या जाळ्यात अडकवलं. सब्बीर मागच्या सात वर्षांपासून महिलेच्या संपर्कात होता. जेव्हा महिलेच्या पतीला समजलं. आपला संसार मोडतोय हे लक्षात आल्यानंतर महिलेच्या पतीने जीम ट्रेनरशी संपर्क साधला.
महिलेच्या पतीने जीम ट्रेनरला तिच्यापासून लांब रहायला सांगितलं. पण या जीम ट्रेनरने आपले खरे रंग दाखवले. त्याने ब्लॅकमेलिंगची धमकी दिली. आरोपी सब्बीरने महिलेसोबत काही खासगी फोटो काढले होते. त्याने महिलेच्या वैवाहिक आयुष्यात अडचणी निर्माण करायला सुरुवात केली. फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन ब्लॅकमेलिंग सुरु केली. महिलेचा पती सब्बीरशी बोलला, तेव्हा त्याने महिलेसोबतचे फोटो सार्वजनिक करण्याची धमकी दिली. हे फोटो व्हायरल न करण्यासाठी त्याने महिलेच्या पतीकडे 5 लाख रुपये मागितले. त्याशिवाय पतीला जीवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर महिलेचा पती पोलीसांकडे गेला. त्याने सर्व घडलेला प्रकार सांगितला.
आधी चारित्र्याची पडताळणी करा
महिलेच्या पतीने पोलिसात तक्रार दाखल करताच पोलिसांनी लगेच पावलं उचलली. सूरत SOG पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी सब्बीर अजगर ट्रंकवाला याला अटक केली. महिलेच्या पतीने सब्बीरला भेटून वारंवार त्याला फोटो व्हायरल न करण्याची विनंती केली होती. सूरत पोलिसांच्या SOG टीमचे डीसीपी राजदीप सिंह नकुम यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं की, “काही दिवसांपूर्वी त्यांनी जीम ट्रेनर आणि संचालकांची एक बैठक बोलावली होती. त्यात त्यांनी सांगितलेलं की, तुम्ही जे कुठले ट्रेनर नियुक्त करता त्यांच्या चारित्र्याची पडताळणी करा. त्यानंतरच कामाला ठेवा”