जगात प्रत्येकजण तुमचा हितचिंतक नसतो, चाणक्य यांच्या या चार गोष्टी तुम्हाला शत्रूपासून वाचवतील
Tv9 Marathi April 15, 2026 03:45 PM

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. आपल्या या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत, ज्या आजच्या काळात देखील मार्गदर्शक ठरतात. चाणक्य यांचे विचार आजही अनेकांना प्रेरणा देतात. चाणक्य आपल्या या ग्रंथामध्ये मैत्रीबाबत लिहिताना म्हणतात, या जगातील प्रत्येक व्यक्ती हा तुमचा हितचिंतक असू शकत नाही. जगात अनेकजण असे असतात जे केवळ स्वार्थासाठी तुमच्याशी मैत्री करतात. त्यांचा स्वार्थ साध्य झाल्यानंतर ते तुमची साथ सोडतात. त्यामुळे अशा लोकांपासून नेहमी सावध राहावं अन्यथा आयुष्यात पश्चतापाची वेळ येते. चाणक्य यांनी अशा चार गोष्टी सांगितल्या आहेत, ज्याच्या मदतीने आपण आपला खरा मित्र कोण आणि शत्रू कोण? हे ओळखू शकतो, तसेच शत्रूपासून सावध कसं राहायचं? हे देखील चाणक्य यांनी सांगितलं आहे.  चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

आपली कमोजरी उघड करू नका – चाणक्य म्हणतात प्रत्येकजणाचा कोणता न कोणता विक पॉइंट असतो, मात्र त्याबाबत तुम्ही कोणाशीही कधीही बोलू नका. काण तुमचा मित्रही कधी कधी तुमचा शत्रू बनू शकतो. त्यामुळे कधीही आपली कमकुवत बाजू लोकांना सांगू नका.

विश्वास ठेवा पण डोळे झाकून विश्वास ठेवू नका – चाणक्य म्हणतात विश्वासावरच जग चालतं, त्यामुळे तुम्ही एखाद्या व्यक्तीवर विश्वास ठेवू शकता. मात्र कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका, असा सल्ला चाणक्य यांनी दिली आहे.

शांत राहा – चाणक्य म्हणतात शत्रू किंतीही बलवान असला तरी तुम्ही विचलित होऊ नका, शांत रहा. शांत राहून योजना बनवा तुम्हाला नक्कीच यश मिळेल.

कमी बोला – चाणक्य म्हणतात अनेकदा आपण खूप जास्त बोलतो, आपल्या बोलण्यातून आपली रहस्य उघड होत असतात, त्यामुळे कमी बोला.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.