आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला मार्गदर्शन करणारे कोणी ना कोणी तरी हवे असते. त्यामुळे मार्ग चूकत नाही. पण आचार्य चाणाक्य यांनी चाणाक्य नीतीमध्ये अनेक गोष्टींचे महत्त्व पटवून दिले आहे. चाणक्य नीती सांगते की, जर एखाद्या व्यक्तीला जीवनात प्रगती करायची असेल, तर तो चाणक्य नीतीकडून काही गोष्टी शिकू शकतो. चाणक्य हे जगाने पाहिलेल्या महान विद्वानांपैकी एक होते. त्यांना कौटिल्य म्हणूनही ओळखले जात असे. त्यांनी त्यांच्या चाणक्य नीतीमध्ये व्यक्तीच्या यशासाठी आवश्यक असलेल्या अनेक गोष्टींचा उल्लेख केला आहे. काळ लोटून गेल्यानंतरही, त्यांचे प्रत्येक वचन आजही अत्यंत महत्त्वाचे आहे. चाणक्य नीती सांगते की, जर एखाद्या व्यक्तीला जीवनात प्रगती करायची असेल, तर तो कावळ्याकडून काही गोष्टी शिकू शकतो. त्यामुळे कावळ्याचा कधीच तिरस्कार करु नका… तर जाणून घ्या त्या कोणत्या गोष्टी आहेत…
कावळ्याकडून शिकण्यासारखे गुणएकाग्रता, सतर्कता : कावळ्याकडून शिकण्यासारखी पहिली गोष्ट म्हणजे त्याची एकाग्रता आणि सतर्कता. कावळा नेहमी सतर्क असतो. त्याला आपल्या सभोवतालच्या परिस्थितीची पूर्ण जाणीव असते. त्याचप्रमाणे, माणसांनीही आपली ध्येये आणि सभोवतालच्या परिस्थितीबद्दल जागरूक असले पाहिजे. तरच ते धोके ओळखू शकतात आणि संधींचा फायदा घेऊ शकतात.
गुप्त : कावळे खूप गुप्तता बाळगतात. ते आपली घरटी गुप्तपणे बांधतात. त्याचप्रमाणे, चाणक्य म्हणतात की माणसांनी आपली महत्त्वाची ध्येये पूर्ण होईपर्यंत गुप्त ठेवली पाहिजेत.
आळसाचा अभाव : कावळ्यांकडून शिकण्यासारखा आणखी एक धडा म्हणजे त्यांचा आळसाचा अभाव. ते कधीही स्वस्थ बसत नाहीत. ते अन्नासाठी कठोर परिश्रम करतात. त्याचप्रमाणे, ज्यांना आयुष्यात यशस्वी व्हायचे आहे, त्यांनी आळशी न राहता आपले ध्येय गाठण्यासाठी नेहमी कठोर परिश्रम केले पाहिजेत.
परिस्थितीनुसार जगा : कावळ्यामध्ये कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीत टिकून राहण्याची क्षमता असते. त्याला जे अन्न मिळते त्यात तो समाधानी असतो आणि अधिक चांगल्यासाठी प्रयत्न करतो. त्याचप्रमाणे, माणसांनीही जीवनातील संकटांमुळे खचून न जाता परिस्थितीनुसार वागायला शिकले पाहिजे आणि त्याच वेळी अधिक चांगल्यासाठी प्रयत्न करत राहिले पाहिजे.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)