Vidhan Parishad Election 2026: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) झाली आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. (Vidhan Parishad Election 2026) या निवडणुकीच्या अनुषांगाने महाविकास आघाडीकडीतील काही बड्या नेत्यांची नावे चर्चेत आली आहेत. तर विधानसभेतील संख्याबळानुसार भाजपच्या वाट्याला 5, शिवसेना 2, राष्ट्रवादी 1 आणि महाविकास आघाडी 1 जागा येण्याची शक्यता आहे. विधान परिषदेसाठी ठाकरेंच्या शिवसेनेकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) जाणार की दुसरा उमेदवार देणार? याची चर्चा सुरू असतानाच आता काँग्रेसने देखील हालचाली सुरू केल्याच्या चर्चा आहेत. काँग्रेस पक्षातील काही नेत्यांची नावे देखील विधानपरिषदेसाठी चर्चेत आली हे नेते देखील विधानपरिषदेसाठी इच्छुक असल्याची माहिती आहे.
काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुझफ्फर हुसेन (Muzaffar Hussain), सचिन सावंत (Sachin Sawant), हनमंत पवार (Hanmant Pawar), राजेश राठोड (Rajesh Rathod) यांची नावं विधानपरिषदेसाठी चर्चेत आली आहेत . त्यामुळे आता महाविकास आघाडीला मिळणारी एक जागा नेमकी कोणत्या पक्षाला मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
विधान परिषद उमेदवारीसाठी उद्धव ठाकरे महाविकास आघाडीकडून उमेदवार असतील. तर महाविकास आघाडीमध्ये कुठले प्रकारची चर्चा न करता इतर दोन पक्षांकडून उद्धव ठाकरेंच्या नावाला पाठिंबा दिला जाईल. अशा प्रकारची भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष त्यासोबतच काँग्रेस पक्षाकडून मांडण्यात आली आहे. मात्र यामध्ये उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाण्यास इच्छुक नसतील, तर मग ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेवर जाण्यासाठी राज्यसभेप्रमाणे अनेक नेत्यांची नावे चर्चेत आहेत.
ठाकरेंच्या शिवसेनेकडून विधान परिषदेसाठी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, प्रवक्त्या सुषमा अंधारे (Sushma Andhare), माजी खासदार विनायक राऊत (Vinayak Raut), माजी खासदार राजन विचारे (Rajan Vichare), माजी आमदार वैभव नाईक (Vaibhav Naik), सचिव सूरज चव्हाण (Suraj Chavan) या पाच ते सहा नावाची चर्चा आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे स्वतःच विधान परिषदेवर जाण्याचा निर्णय घेतात की आपल्या पक्षातील इतर नेत्याला विधान परिषदेसाठी संधी देतात हे पाहावे लागेल.
उद्धव ठाकरे (शिवसेना – उबाठा)
नीलम गोऱ्हे (शिवसेना)
शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी – शरद पवार गट)
अमोल मिटकरी (राष्ट्रवादी – अजित पवार गट)
गोपीचंद पडळकर (भाजप)
रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
राजेश राठोड (काँग्रेस)
प्रवीण दटके (भाजप)
रमेश कराड (भाजप)
प्रज्ञा सातव
निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
मतदानाची तारीख: 12 मे 2026
मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026
आणखी वाचा