PBKS vs LSG Live: मॅच फिरली... रिषभ पंतची 'चूक' महागात पडतेय; मिचेल मार्शचं ऐकलं नाही, आता भोगा कर्माची फळं... फलंदाज धु धु धूतायेत
esakal April 20, 2026 12:45 AM

Punjab Kings vs Lucknow Super Giants marathi Updates: इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधील एकमेव अपराजित संघ, पंजाब किंग्सविरुद्ध लखनौ सुपर जायंट्सने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. LSG ला मागील दोन सामन्यांत हार पत्करावी लागली आहे आणि पंजाबचा सामना करणे सोपं नाही याची जाण त्यांना आहे. त्यांनी प्लेइंग इलेव्हनमध्ये दिग्वेश राठीच्या जागी एम सिद्धार्थ याला आज संधी दिली आहे. PBKS विजयी संघच घेऊन मैदानावर उतरला आहे. पंजाबला सुरुवातीलाच धक्के देण्याची संधी होती, परंतु रिषभ पंतच्या ( Rishabh Pant) चुकीने त्यांना खड्ड्यात घातले.

LSG XI - मिचेल मार्श, आयुष बदोनी, रिषभ पंत, एडन मार्करम, निकोलस पूरन, मुकूल चौधरी, मोहम्मद शमी, आवेश खान, प्रिंस यादव, एम सिद्धार्थ, मोहसिन खान.

PBKS XI - प्रभसिमरन सिंग, प्रियांश आर्य, कूपर कॉनली, श्रेयस अय्यर, नेहल वढेरा, शशांक सिंग, मार्कस स्टॉयनिस, मार्को यान्सेन, झेव्हियर बार्टलेट, अर्शदीप सिंग, युझवेंद्र चहल.

Cooper Connolly LBW decision not reviewed analysis

मोहम्मद शमीने पहिल्याच षटकात पंजाबला धक्का दिला. प्रभसिमरन सिंग भोपळ्यावर स्लीपमध्ये झेल देऊन माघारी परतला. मोहसिन खानने टाकलेल्या दुसऱ्या षटकात कुपर कॉनली पायचीत झाला असता, परंतु रिषभ पंतने DRS न घेतल्याने त्याला जीवदान मिळाले. रिषभ विचार करत राहिला आणि शेवटचे सेकंद शिल्लक असताना नकार देत माघारी फिरला. त्यानंतर रिप्ले पाहिला गेला, त्यात कॉनली पायचीत झाला असता हे स्पष्ट झाले. रिषभची ही चूक आता लखनौला महागात पडताा दिसतेय.

RR vs KKR Live: कोलकाताने अखेर विजय मिळवला; राजस्थानला Rinku Singh चा झेल सोडणे महागात पडले, मुंबई इंडियन्सला धक्का

जीवदान मिळाल्याचा पुरेपूर फायदा घेताना कूपर व प्रियांश या दोघांनी LSG च्या गोलंदाजांना चांगला चोप दिला. प्रियांशने १९ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले आणि या पर्वातील त्याचे दुसरे व एकूण १४ वे अर्धशतक ठरले. प्रियांशने तिसऱ्यांदा आयपीएलमध्ये २० पेक्षा कमी चेंडूंत फिफ्टी झळकावली आहे. यासह त्याने जॅक फ्रेझर मॅकगर्क, वैभव सूर्यवंशी यांच्याशी बरोबरी केली. या विक्रमात अभिषेक शर्मा ( ६) व निकोलस पूरन ( ४) हे पुढे आहेत. त्याने कूपरसह ५४ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. कूपरनेही ३४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.