मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात नाशिकच्या आयटी कंपनीमध्ये महिला कर्मचाऱ्यांचं लैंगिक शोषण तसचं त्यांच्या धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचं प्रकरण गाजत आहे. अख्खा महाराष्ट्र या घटनेने हादरला आहे. मल्टीनॅशनल कंपनीत काम करणाऱ्या तरूणींना चांगल्या करिअरचं स्वप्न दाखवत, त्यांच्याशी अश्लील वर्तन करण्यात आलं. आता TCS मधील एक कर्मचारी समोर येऊन टीव्ही 9 मराठीशी या मुद्यावर एक्सक्लुझिव्ह बोलला आहे. त्याने कंपनीतील वास्तव सांगितलं आहे. “गेल्या 25 वर्षांपासून या क्षेत्रात मी काम करतोय. विदेशी कंपन्यांमध्ये मी काम केलंय. रमजानमध्ये हे लोकं 5 वेळेस नमाज पढतात. अतिशय उर्मटपणे वागून अक्षरशः मिटिंगमधून उठून जातात. वॉशबेसिनमध्ये पाय धुतात. आमच्या मिटिंग हॉलला प्रार्थना स्थळ बनवलेलं आहे. यावर लक्ष दिलं जात नाही. त्यांचा तो सगळा अवतार बघून भीती वाटते” असं TCS या प्रसिद्ध IT कंपनीतील कर्मचाऱ्याने टीव्ही 9 मराठीशी बोलताना सांगितलं.
“ते लोकं आपल्याला तुच्छ समजतात. त्यांना कसलीही लाज वाटत नाही. ते त्यांचा धर्म पाळतात. हे सर्व बघून धक्का बसतो” असं याटीसीएसमधील कर्मचाऱ्याने सांगितलं. “याच्या विरुद्ध आवाज कसा उठवणार? हा आयटी क्षेत्रातील सामान्य कर्मचाऱ्याला धाक बसलेला असतो. वरिष्ठांशी संगनमत आहे असं नाही पण या लोकांची मुजोरी आहे. कितीही महत्वाचं काम असलं तरी हे लोकं येत नाहीत. त्यांची ही मुजोरी मोडून काढण्यासाठी आयटी कंपन्यांनी काहीतरी कठोर पावले उचलायला हवी. त्याचबरोबर हिंदूंमध्ये प्रबोधन होणं गरजेचं आहे” असं या TCS कर्मचाऱ्याने सांगितलं.
‘पण या लोकांची मुजोरी आहे हे नक्की’
“कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी हे प्रबोधन गरजेचं आहे. TCS मध्ये चांगले नियम आहेत. पण या लोकांची मुजोरी आहे हे नक्की. TCS ची जोड आहे असं म्हणू शकत नाही. इस्लाम धर्मियांच्या मुजोरीमुळे ही घटना घडलेली असावी. काही आयटी कंपन्यांमध्ये पेहराव काय असावा याची लिस्ट असते. फ्रान्सच्या एक कंपनीने हिजाबचा फोटो होता. पण भारतीय पेहराव नव्हता. आम्ही मेल केल्यानंतर 8 दिवसांनी त्या ड्रेसकोडमधून हिजाबचा फोटो काढला” असं या कर्मचाऱ्याने सांगितलं.
‘हिंदूविरोधी कोणी असेल तर प्रकरण दाबलं जाऊ शकतं’
“70 टक्के हिंदू असताना एकाच धर्माचं प्रबोधन का करतात?. आयटी कंपन्यांमध्ये पॉश युनिट अतिशय प्रभावी काम करत. पण त्यांच्याकडे तक्रार जाणं गरजेचं आहे. पण जर त्या कमिटीमध्ये हिंदूविरोधी कोणी असेल तर प्रकरण दाबलं जाऊ शकतं. पण पॉश हा कायदा खूप कडक आहे. या गोष्टींना अटकाव करण्यासाठी अतिशय कडक पावलं उचलणं गरजेचं आहे. याबाबत हिंदूंनी जागरूक व्हावं. मुसलमानांनी देखील असं कृत्य करू नये” असं हा टिसीएस कर्मचारी म्हणाला. “मानवता हा धर्म आहे. धर्मांतराची सक्ती करू नये आणि खपवून पण घेऊ नये. यावर आवाज उचलणं जास्त गरजेचं आहे” असं हा कर्मचारी म्हणाला.