Nashik IT Company Nida Khan: नाशिक येथील टाटा कन्सल्टन्शी सर्व्हिसेज TCS च्या कार्यालयात जबरदस्ती धर्मांतरण आणि लैंगिक छळ प्रकरणाने देश हादरला आहे. कॉर्पोरेट जगतातील षडयंत्र समोर आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. याप्रकरणातील मुख्य आरोपी निदा खान ही पहिल्या दिवशीच फरार झाली. ती अजून यंत्रणांच्या हाती लागलेली नाही. पण तिचे लोकेशन सापडल्याचा दावा करण्यात येत आहे. तपास यंत्रणांच्या मते ती सध्या मुंबईतील भिवंडीत लपलेली आहे. तर अटकेपासून वाचण्यासाठी ती गरोदरपणाचा आव आणत असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. तिने अटकेपासून वाचण्यासाठी कोर्टात अर्ज दाखल केला आहे. जोपर्यंत तिची वैद्यकीय चौकशी होत नाही तोपर्यंत ती गरोदर असल्याबाबात ठामपणे सांगता येत नाही.
कोर्टाकडे निदा खानची धाव
कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांचे धर्मांतरण करण्यासाठी निदा खान हिने त्यांच्यावर दबाव टाकला. त्यांचा छळ केला. ती मुलींना बुर्का कसा घालायचा याचे जबरदस्तीने प्रशिक्षण देत असल्याचा आरोप पीडितांनी केला आहे. तर इतर कर्मचाऱ्यांनी यातील काही महिला कर्मचाऱ्यांचा लैंगिक छळ केल्याचा आरोपही करण्यात आला आहे. याप्रकरणात दोघांना न्यायालयात हजर करण्यात आले आहेत. निदा खान हिचे दिल्ली स्फोटातील आरोपींशी लिंक असल्याचेही तपासात समोर येत आहे. तर ती गरोदर असल्याचा दावा करत कोर्टात अटकपूर्व जामीनासाठी धाव घेण्यात आली आहे.
ऑफिसमध्ये बुर्का कसा घालावा हे शिकवत होती निदा
टीसीएस प्रकरणात दिवसाआड नवनवीन खुलासे होत आहेत. निदा खान ही धर्मांतरणाच्या षडयंत्राची मास्टरमाईंड आहे. ती कार्यालयात दबंग सारखी वागायची. महिला कर्मचारी तिला घाबरून असायच्या. तर पुरूष कर्मचाऱ्यांनाही ती धमकवायची. इतर सहकाऱ्यांच्या मदतीने ती मनमानी करायची. ती महिला कर्मचाऱ्यांना बुर्का कसा परिधान करायचा याचे प्रशिक्षण देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. तर जे कर्मचारी इतर कर्मचाऱ्यांना विशिष्ट धर्माची विचारसरणी अंगिकारण्यास सांगायचे त्यांच्या पाठीशी निदा खान कायम असायची. धर्मांतरणासाठी ती विविध प्रकारे दबाव टाकत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. पोलीस निदा खान हिला अटक करण्याचा प्रयत्न करत आहे. पण ती अद्याप पोलिसांच्या हाती लागलेली नाही. उलट तिने कोर्टात जामीनासाठी धाव घेतली आहे. म्हणजे ती पोलिसांवर शिरजोर ठरल्याचा आरोपही होत आहे. तर तिला कुणाचे अभय आहे. पोलीस तिच्यापर्यंत का पोहचू शकले नाही या चर्चांमुळे नाशिक पोलिसांच्या कारभारावर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित आहेत. पोलिसांवर याप्रकरणात कुणाचा दबाव आहे का, असा सवालही करण्यात येत आहे.