Yavatmal Crime News: यवतमाळ जिल्ह्यातील राळेगाव तालुक्यात 6 महिन्यात तब्बल 34 आदिवासी मुली गायब झाल्याचे पुढे आले आहे. त्यात त्यांची मानवी तस्करी केली जात असल्याची धक्कादायक माहीती हाती आली आहे. यात एक मुलगी आणि एक प्रियकर त्यांचा कथित ऑडिओ क्लिप समोर आली आहे. त्यात कशा पध्दतीने मानवी तस्करी (Crime news) केली जाते, हे सांगितलं जातं आहे. या प्रकरणात मुख्य आरोपी हा राळेगावमधील मजहर कुरेशी असल्याचा दावा करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणातील संशयित आरोपीला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. मात्र पोलिसांनी त्याला सोडून दिले आहे. त्यांनतर तो तेलंगणामध्ये पळून जात असताना त्याला पुन्हा पकडले गेले. यात पोलिसांनी आरोपीला मदत करणाऱ्या पोलिसांना तपासापासून दूर ठेवावे, तसेच त्याच्यावर निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली होती. यात आदिवासी मुलींना त्याच्या पालकांना पैश्याचे आमिष देऊन अश्या पध्दतीने फूस लावली जात आहे. ही गंभीर बाब आहे. आम्ही गृह विभागकडे याबाबत माहीत दिली आहे. राज्य सरकार सुद्धा गंभीर आहे. यात लवजिहाद, धर्मांतर असा अँगल असू शकतो, याचे चौकशी करण्यात यावी, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चव्हाण यांच्याकडून करण्यात आली आहे.
Yavatmal Crime News: या प्रकरणातील कथित ऑडिओ क्लिपमधील संवाद काय?
मुलगा - काय म्हणता.
मुलगी - पोरीचं काम घेऊन चालली मी पुण्याले.
मुलगा - अच्छा..अच्छा
मुलगी - एकटी नाही, तर काय दहा जण नेणार का?...शुभम मामा, आहे.. पोरी काढणारा.
मुलगा - शुभम मामा कोण... कुठला आहे?
मुलगी - आपल्याच गावातला आहे. फुकटनगरचा..
मुलगा - ते कल्याणी आत्या काम करते काम..
मुलगी - हो
मुलगा - तिने काम सोडलं?
मुलगी - नाही
मुलगा - आपल्या गावात दिसते ती घराजवळ.. कल्याणी आत्या
मुलगी - मोबाईलवर काम करते
मुलगा - अच्छा... असं आहे का?
मुलगी - तिला जेल झाली होती या कामसाठी, तेव्हापासून मोबाईलवर काम करते. तीच निल झालं कि जाईल ती आता..
मुलगा - तीच नवरा?
मुलगी - बाप कल्याणी आत्याचा लग्न करून दिल होतं.. ते निघाली होती..
मुलगा - मजहर कुरेशी
मुलगी - हो, त्याचं दिल होत करून. खतरनाक काम आहे..
मुलगा - मदन कुरेशी हे काम करते
मुलगी - हो, ते कुरेशी करते काम, पैसा लय आहे पण बद्दूव्वा लागते..
मुलगा - तुला काय वाटे चागलं काम आहे का?
मुलगी- मला चागलं नाही वाटत, सांगत आहे.. पैसा भेटेत पण बद्दूव्वा लागते..
मुलगा - अच्छा मग तिघ चौघे आहे, पोरी काढण्यात आणि विकण्यात..
मुलगी - बापरे तिघ, तिघ चौघे नाही, लई जण आहे.. यात काम करते रॅकेट आहे.. पूनम अत्या आहे. किती जण आहे सांगू शकत नाही..
मुलगा - बापरे......
मेन कोण आहे...
मुलगी - यात मेन कोण नाही..यात काम लावणारे मेन आहे...