भोंदू अशोक खरात प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. अशोक खरात यांना कोण-कोण फोन करायचं. त्यांना कुठल्या राजकारण्याने किती कॉल केले? कोण किती मिनिटं बोलला? या बद्दल अंजली दमानियांनी यांनी माहिती दिली आहे. “अशोक खरात यांना फोन कॉल करणाऱ्यांमध्ये रुपाली चाकणकर दुसऱ्या नंबरवर आहेत. तिसऱ्या क्रमांकावर दीपक लोढे, चौथ्या नंबरवर कल्पना, खरातांची बायको आहे. पण अजून एक महत्वाचं नाव आहे. त्याच्या चौकशीची मी एसआयटीकडे मागणी करणार आहे. प्रॉपर्टी, पैशाचे व्यवहार, एमआयडीसीची जमीन घेण्यासाठी ज्या ज्या अधिकाऱ्यांनी जवळच्या लोकांनी मदत केली, त्यांची नाव वाचून दाखवलीत” असं अंजली दमानिया म्हणाल्या.
“यात खरातांना कॉल करण्यात तिसऱ्या नंबरवर असलेले दीपक लोंढे हे दीपक केसरकरांच्या जवळचे आहेत. त्यांनी 189 कॉल्स केले” असं अंजली दमानिया म्हणाल्या. “बाळासाहेब बोराडे यांनी 156 नंदकिशोर काटोर डॉक्टर आहेत. सचिन सुंबाळे 177 कॉल्स, नंदकिशोर यांनी 106 कॉल्स केले. राहुल देशमुख, अविनाश पोटे, महेंद्रशेळके पाटील यांचा रोल तपासला जावा” अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.
इतकी काय घाई झालेली खरातची प्रकरणं संपवण्याची?
“धक्कादायक बाब अशी की, तहसीलदार, डेप्युटी कलेक्टर, पीआय, नाव बघून मी हैराण होते. का यांनी खरातला शेकडो फोन कॉल्स केले?. चाकणकर म्हणाल्या माझा काही हात नाही. महिला आयोगाकडून नोटीस पाठवून 9 तासात सुनावणी घेतली. इतकी काय घाई झालेली खरातची प्रकरणं संपवण्याची? याची चौकशी झाली पाहिजे. एसआयटीने त्यांना खरंतर ताबडतोब बोलवायला पाहिजे होती. सगळ्या राजकारण्यांना शो कॉज नोटीस पाठवली पाहिजे. हे सर्व चुकीच आहे. प्रतिभा चाकणकर म्हणतात माझ्या सह्या, खाती खोट्या आहेत. मला कोणी बोलावलं नाही, मी इथे फेरफटका मारायला आली आहे. त्यांना चौकशीसाठी बोलावलं होतं” असा दावा अंजली दमानिया यांनी केला.