पुणे: राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे. त्यात अकोला शहरात सगळ्यात जास्त तापमानाची (Heat Wave Weather updates) नोंद झाली आहे. मात्र 17 एप्रिल हा दिवस एप्रिल महिन्यातील सगळ्यात उष्ण दिवस असण्याची शक्यता आहे. कारण अर्ध्या महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याचा इशारा हवामान खात्याने (Heat Wave Weather updates) वर्तवला आहे. त्यात पुणे शहराच (Heat Wave Weather updates) तापमान देखील वाढण्याची शक्यता आहे. मात्र 18 आणि 19 एप्रिलला या उकाड्यापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे, काही ठिकाणी पावसाचा इशारा देखील देण्यात आला आहे. पुढील दोन दिवस प्रत्येक शहरात 1 ते दोन अंशाने तापमान वाढणार असल्याची हवामान खात्याची माहिती आहे. (Heat Wave Weather updates)
सोलापूर
सांगली
सिंधुदुर्ग
रत्नागिरी
रायगड
ठाणे
मुंबई
पालघर
परभणी
हिंगोली
जालना
संभाजीनगर
अकोला
अमरावती
वर्धा
जळगाव
शिवाजीनगर
अहिल्यानगर
अमरावती
अकोला
बुलढाणा
जालना
बीड
सोलापूर
सांगली
सातारा
परभणी
नांदेड
हिंगोली
यवतमाळ
चंद्रपूर
वर्धा
जळगाव
संभाजीनगर
जालना
अकोला
अमरावती
नागपूर
वर्धा
यवतमाळ
चंद्रपूर
हिंगोली
परभणी
नांदेड
धाराशिव
सोलापूर
• पुरेसे पाणी प्या, तहान लागलेली नसली तरीही दर अर्ध्या तासाच्या फरकाने पाणी प्या.
• उन्हात काम करत असल्यास ओल्या कपड्याने डोके मान चेहरा झाकून ठेवा. सूर्यप्रकाशाचा थेट संपर्क टाळावा.
• टरबूज, खरबूज, संत्री, द्राक्षे, अननस, काकडी व स्थानिक उपलब्ध पाणीदार फळे आणि पाणीदार भाज्या यांचा आहारात समावेश करा.
• घर थंड ठेवण्यासाठी खिडक्यांना पडदे लावा, रात्री खिडक्या उघड्या ठेवा आणि गारव्यासाठी पंखे किंवा ओल्या कपड्यांचा वापर करा.
• हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत.
• घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री, टोपीचा आणि गॉगल वापर करा.
• ओआरएस (ORS), घरी बनवलेली लस्सी, कोशिंबीर, कैरीचे पन्हे, लिंबू-पाणी किंवा ताक यांचा नियमित आहारात वापर करा.
• दारू, चहा, कॉफी आणि कार्बनिटेड थंड पेये किंवा जास्त साखर असलेली पेये घेऊ नका, कारण त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊ शकते.
• उन्हात अतिश्रमाची किंवा शारीरिक कष्टाची कामे करणे टाळा.
• उच्च प्रथिनयुक्त आणि शिळे अन्न खाणे टाळा.
• दुपारी १२ ते ३ दरम्यान घराबाहेर पडू नका. छतावर जाऊन नका किंवा वरच्या मजल्यावर थांबणे टाळा.
• गडद रंगाचे, घट्ट किंवा जाड कपडे घालणे टाळावे.
• बाहेर जाताना अनवाणी जाऊ नका; नेहमी शूज किंवा चप्पल वापरा.
• उन्हाच्या कालावधीत बंद ठिकाणी स्वयंपाक करणे टाळावे.