Latest Marathi News Live Update: पुण्यात घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त
esakal April 15, 2026 10:45 PM
पुण्यात घरगुती गॅसचा काळाबाजार उघडकीस; १०३ गॅस सिलिंडरसह १० लाखांचा मुद्देमाल जप्त

पुणे, ता. १५ : घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरून काळाबाजार करणाऱ्या एका अड्ड्यावर काळेपडळ पोलिसांनी छापा टाकला. या कारवाईत १०३ गॅस सिलिंडर आणि चारचाकी वाहनासह सुमारे दहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Chhatrapati Sambhajinagar Live छत्रपती संभाजीनगर शहरात मोबाईल चोरीला विरोध; तरुणावर चाकू हल्ला

छत्रपती संभाजीनगर शहरातील एपीआय कॉर्नर परिसरात मोबाईल चोरीला विरोध केल्यामुळे करण राधाकिसन जाधव या तरुणावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आरोपींनी त्याच्या पोटात चाकू खुपसल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला असून संपूर्ण प्रकार स्पष्ट झाला आहे. मुकुंदवाडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.

Hingoli Live: आमदारांचा एखादा मंत्री फोन उचलत नसेल तर त्याला मंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही

आमदारांचा एखादा मंत्री फोन उचलत नसेल तर त्याला मंत्री म्हणून घेण्याचा अधिकार नाही.  मंत्री म्हणजे एका विधानसभे पुरता मर्यादित नाही, बाकीच्या मतदारसंघात/ जिल्ह्यात काय चाललंय त्या पद्धतीने त्या मंत्र्यांनि काम करायला पाहिजेत.  आमदार संतोष बांगर यांचा रोष नेमका कोणत्या मंत्र्यावर..?

Chatrapati Sambhajinagar Live: छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळीचा पावसाचा धोका

छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळीचा पावसाचा धोका. पुढील तीन दिवसांसाठी हवामान विभागाचा इशारा. आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट तर 17 एप्रिलला यलो अलर्टचा हवामान खात्याचा इशारा. अवकाळी पावससह ताशी 50 ते 60 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता. हवामान खात्याच्या इशाऱ्याने शेतकऱ्यांचा जीव पुन्हा टांगणीला. राज्यात उष्णतेची लाट तर छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळीचे ढग.

Nature Live: राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढणार

राज्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढणार… सातारा जिल्ह्याचं तापमान सरासरी 41 अंशांच्या पलीकडे… सातारा शहरात नेहमी असणारी वर्दळ कडक उन्हामुळे मंदावली… विनाकारण घराबाहेर पडू नये… जिल्हा प्रशासनाच्या सूचना…

गांजा विकणाऱ्या दोन आरोपींना अटक

गांजा विकणाऱ्या दोन आरोपींना अटक

अंधेरी पूर्व परिसरात MIDC पोलिसांची मोठी कारवाई

मुंबईच्या अंधेरी पूर्व परिसरात एमआयडीसी पोलिसांची मोठी कारवाई

महाकाली केव्हज परिसरामध्ये गांजा विकणाऱ्या दोन आरोपींना एमआयडीसी पोलिसांनी केली अटक

अटक आरोपीकडून पोलिसांनी 22 किलो गांजा केला जप्त

या गांजाचा बाजार भाव जवळपास साडेपाच लाख रुपये

मोठी बातमी! अंदमान बेटाजवळील समुद्रात जहाज बुडालं; २५० जणांचा मृत्यू

मोठी बातमी! अंदमान बेटाजवळील समुद्रात जहाज बुडालं; २५० जणांचा मृत्यू

अंदमान बेटाजवळील समुद्रात भीषण दुर्घटना घडली आहे. अंदमानच्या समुद्रात एक जहाज बुडाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत जवळपास अडीचशे लोकांचा बुडून मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या जहाजात रोहिंग्या निर्वासित आणि बांगलादेशी नागरिकांचा समावेश होता. या भीषण घटनेने अंदमान बेटावर राहणाऱ्या लोकांमध्ये भीती पसरली आहे.

Nashik Live: अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

अश्विनी चेनानीला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली

चेनानीची रवानगी आता कारागृहात होणार

Nashik Live: IT कंपनीतील धर्मांतरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातील मॅनेजर आणि HR अश्विनी चेनानीला कोर्टात आणलं

- अश्विनी चेनानीची पोलीस कोठडी आज संपत असल्यानं चेनानीला कोर्टात हजर करण्यात आलं

- थोड्याच वेळात सुनावणीला होणार सुरुवात

- अश्विनी चेनानीला आज पुन्हा पोलीस कोठडी देण्यात येणार की न्यायालयीन कोठडीत रवानगी होणार, याकडे लक्ष

Weather Update: जळगावचा पारा ४२.६ अंशां पेशा अधिक, दुपारी रस्त्यावर शुकशुकाट

सकाळी ११ वाजता ३६, दुपारी ३ वाजता ४२, संध्याकाळी ६ वाजता ४० होते तापमान

जळगाव जिल्ह्यातील निसर्गानेही रौद्र रूप धारण केल्याने उन्हाचा तडाखा वाढला होता. शहरात आज तापमान ४२.६ नोंदवले गेले पण प्रत्यक्ष तापमानापेक्षा शरीराला जाणवणारी झळ ( तापमान) तब्बल ४४.६ अंशांपर्यंत पोहोचले दुपारच्या वेळी अक्षरश होरपळवून टाकणाऱ्या झळा लागत आहे

आज सकाळी ८ वाजता ३० अंश पासून सुरू झालेला उन्हाचा पारा दुपारी ३ वाजेपर्यंत ४२ अंशांवर पोहोचला मात्र खरी भीषणता दुपारी दिसून. आली. या वेळी प्रत्यक्ष तापमान ४२.६ अंशांवर गेले

Chh. Sambhajinagar Live: डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीमध्ये झळकले औरंगजेबाचे बॅनर

छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा औरंगजेबाचे फोटो एका तरुणाने झळकावले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत एका तरुणाने हा फोटो झळकवला आहे. तसेच हाच व्हिडीओ इन्स्टाग्रामवर देखील अपलोड केला आहे. या प्रकरणी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांनी आक्षेप घेतला असून, याप्रकरणी पोलीस आयुक्त यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Jalna Live: जालन्यात समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात

जालन्यात समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्स बस आणि भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात घडला आहे.

समृद्धी महामार्गावरील केळीगव्हाण गावाजवळ ही घटना घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅव्हल्स बसने पाठीमागून भंगार घेऊन जाणाऱ्या ट्रकला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रॅव्हल्समधील सुमारे 10 ते 12 प्रवासी जखमी झाले आहेत.

Digital Arrest : पहलगाम हल्ल्याचा धाक दाखवत डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ८२ वर्षीय आजींना ७३.३० लाखांचा गंडा

कल्याण मध्ये अत्यंत धक्कादायक सायबर गुन्ह्याची घटना समोर आली आहे. पहलगाम हल्ल्या’चा धाक दाखवत सायबर भामट्यांनी ८२ वर्षीय आजींना डिजिटल अरेस्टच्या नावाखाली तब्बल ७३.३० लाख रुपयांना गंडा घातला आहे.

Amaravati Live : परतवाडा लैंगिक शोषण प्रकरणी SIT स्थापन; विशेष पथकाकडून सखोल तपास सुरू

अमरावतीतील परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षकांच्या आदेशानुसार ११ पोलिस अधिकारी आणि ३६ अंमलदारांचा या पथकात समावेश आहे. या प्रकरणाचा तपास SIT मार्फत केला जाणार असून, सहाय्यक पोलीस अधीक्षक शुभम कुमार हे या पथकाचे प्रमुख असणार आहेत.

Pune Live : पुण्यात पीएमपी बस ब्रेकडाउन वाढले; मार्चमध्ये १८००हून अधिक बस बंद, प्रवासी त्रस्त

पुण्यात पीएमपी बसच्या ब्रेकडाउनचे प्रमाण मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या महिन्यात तब्बल १८०१ बस मार्गावर बंद पडल्या असून, फेब्रुवारीच्या तुलनेत सुमारे ४०० ने वाढ झाली आहे. विशेषतः ठेकेदारांच्या बस वारंवार बंद पडत असल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पीएमआरडीए क्षेत्रात पीएमपीचे एकूण ३८१ मार्ग असून, या समस्येमुळे प्रवासी वाहतूक विस्कळीत होत आहे.

Live : महिला आरक्षणावरून प्रणिती शिंदेंचा भाजपावर आरोप; ‘डी-लिमिटेशनसाठी महिलांचा वापर’

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी भाजपावर टीका केली आहे. महिला आरक्षणाच्या नावाखाली भाजपाला डी-लिमिटेशन लागू करायचे असल्याचा आरोप त्यांनी केला. महिलांचा केवळ राजकीय हेतूसाठी वापर केला जात असून, या मागे वेगळाच अजेंडा असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

भोसरी फ्री स्टाईल हाणामारी, तीन-चार जणांनी एका तरुणाला बेदम केली मारहाण

पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी परिसरात काही वेळापूर्वी तरुणाच्या एका टोळक्यात जोरदारा फ्री स्टाईल हाणामारी झाली आहे. लांडेवाडीतील एका दुकानाबाहेर तीन तरुणांनी मिळुन एका तरुणाला लाथा बुक्याने बेदम मारहाण केली आहे. मात्र तरुणाचा टोळकं आप आपसात का हाणामारी करत होता हे मात्र समजू शकलं नाही.

नेस्को सेंटर मध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणात लायझनिंग करणारा इंद्रजीत सिंग याला तात्काळ अटक करा; मनसेची मागणी

गोरेगाव नेस्को सेंटर मध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणात लायझनिंग करणारा इंद्रजीत सिंग याला तात्काळ अटक करा

मनसेची मागणी

नेस्को सेंटर मध्ये आयोजित लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट मध्ये ड्रग्स सेवन केल्यामुळे दोन विद्यार्थ्यांच्या दुर्दैवी मृत्यू झाली होती

या लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट चा नावाखाली ड्रग्स पार्टीची परवानगी देखील इंद्रजीत सिंग यांनी घेतली होती

इंद्रजीत सिंग हा नेस्को सेंटरमध्ये कार्यक्रमासाठी पोलीस बीएमसी आणि अग्निशमनदल यांच्यावर प्रेशर आणून परवानगी घ्यायचं

इंद्रजीत सिंग हा मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नाव सांगून सर्व परवानगी घ्यायचं

त्यामुळे या प्रकरणांमध्ये इंद्रजीत सिंग हा मुख्य आरोपी असून सध्या तो फरार असल्याच माहिती मिळत आहे

त्यामुळे त्याला तात्काळ अटक करा असा मनसेकडून मागणी करण्यात येत आहे

इंद्रजीत सिंग याला अटक केल्यानंतर इंद्रजीत सिंग ची चौकशी केली तर सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आणि मंत्र्यांचे कशा पद्धतीने या ठिकाणी प्रेशर करून परवानगी घेतला जात होता याच्या खुलासा होईल

शेअर बाजारात पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने ४७ लाखांची फसवणूक

कल्याणमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक करून अल्पावधीत पैसे दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवत एका व्यक्तीची तब्बल ४७ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी राजस्थानमधून एका आरोपीला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे.

अमरावती लैंगिक शोषण प्रकरणातील ४ आरोपींना अटक

अमरावतीच्या परतवाड्यातील अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण करून व्हिडिओ व्हायरल केल्याचे प्रकरण...

घटनेच्या निषेधार्थ अमरावती जिल्ह्यात संतप्त पडसाद..

आज अचलपुर -परतवाडा शहरातील बाजारपेठ बंद....

सर्वपक्षीय आणी सामाजिक संघटनेकडून अचलपूर परतवाडा बंदचा निर्णय..

आरोपी विरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी....

आतापर्यंत या संपूर्ण प्रकरणांमध्ये चार आरोपींना पोलिसांनी घेतलं ताब्यात....

दुपारी एक वाजता राज्यसभेचे खासदार अनिल बोंडे अमरावती पोलीस महानिरीक्षकांची घेणार भेट

या संपूर्ण प्रकरणाची एस आय टी मार्फत चौकशी ची करणार मागणी

Mumbai Live: दहीसरमध्ये तरुणीला अमानुष मारहाण

दहिसर नवागाव येथील शास्त्रीनगर शिवमंदिरासमोर घडलेला धक्कादायक प्रकार समोर आला असून एका तरुणीला अमानुष मारहाण करण्यात आल्याची घटना सीसीटीव्ह कैद झाली आहे. यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Kolhapur Live: व्यावसायिकाच्या खूनप्रकरणी दोघांना अटक

कोल्हापूरच्या दानोळीत 25 लाखांच्या खंडणीसाठी व्यावसायिकाचे अपहरण करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. अपहरणानंतर बॅटरीने शॉक देऊन खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. टिल्लू पवार आणि राजदीप ताडे या दोघांना पोलिसांनी अटक केली.

Wardha Live : उष्ण शहरांच्या यादीत जगातून सातव्या क्रमांकावर वर्धा जिल्हा

जगभरातील सर्वाधिक उष्ण शहरांच्या यादीत महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्याचा समावेश झाला असून, या यादीत वर्धा जगातून सातव्या क्रमांकावर पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. या धक्कादायक आकडेवारीमुळे प्रशासनासह आरोग्य यंत्रणाही सतर्क झाली आहे.

Amravati Live : अमरावती प्रकरणात 8 व्हिडिओ समोर; अल्पसंख्याक आयोगाचा तपास सुरू

अमरावती जिल्ह्यात घडलेल्या धक्कादायक घटनेत आतापर्यंत एकूण 8 व्हिडिओ समोर आले असून या प्रकरणाने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर हे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या घटनेची गंभीरता अधिक वाढली आहे.

Ratnagiri Live : रत्नागिरीत गवा रेड्याचा वावर वाढला; भिले गावात भीतीचं वातावरण

रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात सध्या गवा रेड्यांचा वावर वाढल्याचं चित्र दिसत आहे. चिपळूण तालुक्यातील भिले गावातही गवा रेड्यांचे दर्शन होऊ लागले असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

Chiplun News : चिपळूणमध्ये गवा रेड्यांचा वावर वाढला

रत्नागिरी जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गवा रेड्यांचा वावर सध्या वाढला आहे. चिपळूण तालुक्यातील भिले गावातही गवा रेडे दिसू लागले आहेत. भिले गावातील भोईवाडी बंदर परिसरात संध्याकाळच्या सुमारास गवा रेड्याचं दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Nesco Drugs Case पिवळी गोळी घेतल्यानंतरचे काहीच आठवत नाही, तरुणीचा जबाब

गोरेगाव नेस्को संकुल ड्रग्स पार्टी प्रकरण शुद्धीवर आलेल्या तरुणीचा पोलिसांनी जबाब नोंदवला आहे. बचावलेल्या तरुणीचा जबाब: “रौनकने दिलेली पिवळी गोळी घेतली, नंतर काहीच आठवत नाही” संबंधित तरुणी थेट रुग्णालयात शुद्धीवर आल्याचे सांगितले. काही विद्यार्थ्यांनी यापूर्वीही ड्रग्ज घेतल्याची कबुली दिलीय.

Nagpur News : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु दोन दिवस नागपूर दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु दोन दिवस नागपूर दौऱ्यावर असून आज सकाळी 11 वाजता एम्सच्या द्वितीय दीक्षांत समारोहास मुख्य अतिथी म्हणून राष्ट्रपती उपस्थित असतील . तर संध्याकाळी चार वाजून पन्नास मिनिटांनी राष्ट्रीय प्रत्यक्ष कर अकादमी येथे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून उपस्थित असणार आहेत.

Nashik News : त्र्यंबकेश्वर दर्शन काळाबाजार प्रकरणी विश्वस्तासह २ पुतण्यांनाही अटक

त्र्यंबकेश्वरचे बहुचर्चित दर्शन काळाबाजार प्रकरणी पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. विश्वस्त पुरुषोत्तम कडलगच्या दोन पुतण्यांना अटक करण्यात आलीय. अभिषेक कडलग आणि ओम कडलग या दोघांना त्र्यंबकेश्वर पोलीसांनी काल रात्री अटक केली. पुतण्यांच्या मध्यस्थीने पुरुषोत्तम हा काळाबाजाराचे रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे.

Mumbai : नीरव मोदीला भारतात आणण्यात येणार

पीएनबी बँक घोटाळा प्रकरणातील मुख्य आरोपी नीरव मोदीला भारतात आणलं जाणार आहे. प्रत्यार्पणाच्या प्रक्रियेसाठी सीबीआयचे पथक लंडनमध्ये गेलं आहे. सध्या नीरव मोदी लंडनमधील तुरुंगात आहे. त्याला मुंबईत ऑर्थर रोड कारागृहात ठेवण्यात येणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.