Maharashtra News: विहीर चोरीला गेली, तरुण शेतकऱ्याने शेतातच मृत्यूला कवटाळलं
Saam TV April 15, 2026 11:45 PM
Summary -
  • हिंगोलीत तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

  • विहीर घोटाळ्यामुळे तणाव वाढल्याचा आरोप

  • पोलिस त्रासामुळे टोकाचे पाऊल उचलल्याची चर्चा

  • गावकऱ्यांची कारवाईची मागणी

संदीप नागरे, हिंगोली

हिंगोलीत भ्रष्ट शासकीय यंत्रणा आणि पोलिसाच्या त्रासाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केली. या शेतकऱ्याने शेतातील झाडाला गळफास घेत आयुष्य संपवलं. २६ वर्षीय गोरख पातळे या शेतकऱ्याच्या आत्महत्येमुळे खळबळ उडाली आहे. विहीर चोरीला गेल्यामुळे या शेतकऱ्याने टोकाचे पाऊल उचलले असल्याची माहिती सोर आली आहे. या प्रकरणी ३ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हिंगोलीच्या हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील धनगरवाडी गावात ही घटना घडली. २६ वर्षीय शेतकरी गोरख पातळेने झाडाला गळफास घेतला. सेनगाव पंचायत समिती अंतर्गत शेतकऱ्यांच्या विहीर कागदावर खोदण्यात आल्याचे प्रकरण आले होते. महिनाभरापूर्वी हिंगोलीच्या सेनगाव पंचायत समितीमध्ये रोजगार हमी योजने अंतर्गत अधिकाऱ्यांनी भ्रष्टाचार करून शेतकऱ्यांच्या शेतात कागदावर विहिरी खोदल्या होत्या.

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांनो हे काम लगेच करा, अन्यथा मिळणार नाही ₹२०००; पीएम किसान योजनेबाबत मोठी अपडेट

विहीर चोरीच्या या घोटाळ्यानंतर सेनगाव पंचायत समितीमधील तीन अधिकारी कर्मचाऱ्यांविरोधात पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला. तर जिल्हा परिषदेच्या सीओनी या प्रकरणात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सेवेतून निलंबित देखील केले होते. या सर्व घोटाळ्यानंतर हिंगोलीच्या आर्थिक गुन्हे शाखेकडून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू होता. या तपासादरम्यान पोलिसांनी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याला चौकशीसाठी बोलावले आणि तिथे मारहाण आणि दमदाटी करत कार्यवाहीची धमकी दिली.

Farmer Loan waiver : महाराष्ट्रातील ७० हजार शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी, ५०० कोटी रुपये मिळणार

त्यामुळे चिंतेत आलेल्या गोरख पातळे या तरुण शेतकऱ्याने आत्महत्या केल्याचा आरोप करण्यात येत आहे. जोपर्यंत दोषी पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह प्रशासकीय अधिकाऱ्यांविरोधात कार्यवाही होत नाही तोपर्यंत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचा गळफास घेतलेल्या अवस्थेतील मृतदेह खाली उतरू देणार नाही असा पवित्रा गावकऱ्यांनी घेतला आहे.

Farmer Success Story: कांदा पिकावर रोटार मारलं, केली आल्याची शेती, बीडच्या शेतकरी भावांनी घेतलं २५ लाखाचं उत्पादन
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.