पॉवरफूल बॅटरी आणि मोठी स्क्रीन असलेला Redmi A7 Pro 5G फोनची भारतात पहिली विक्री सुरू, जाणून घ्या ऑफर्स
Tv9 Marathi April 15, 2026 11:45 PM

शाओमीच्या सब-ब्रँड रेडमी कंपनीने Redmi A7 Pro 5G हा एक नवीन बजेट स्मार्टफोन लाँच केला आहे. जो आता भारतात विक्रीसाठी उपलब्ध आहे. हा फोन विशेषतः अशा वापरकर्त्यांसाठी आहे ज्यांना कमी किमतीत मोठी बॅटरी आणि मोठी स्क्रीन हवी आहे. तर या फोनमध्ये ६३००mAh बॅटरी, 6.9-इंचाचा डिस्प्ले आणि 5जी सपोर्ट त्याला त्याच्या सेगमेंटमध्ये उत्तम ठरवत आहे. तर कंपनीने आकर्षक ऑफर्सदेखील दिल्या आहेत, ज्यामुळे त्याची किंमत आणखी परवडणारी झाली आहे.

किंमत किती आहे आणि ऑफर्स काय आहेत?

Redmi A7 Pro 5G भारतात दोन व्हेरिएंटमध्ये उपलब्ध आहे. 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या बेस मॉडेलची किंमत 12 हजार 499 रूपये आहे, तर 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज असलेला टॉप व्हेरिएंट 13 हजार 499 रूपयांमध्ये उपलब्ध आहे. कंपनी या फोन खरेदीवर ग्राहकांना 1,000 ची इंट्रोडक्टरी ऑफर देखील देत आहे, ज्यामुळे प्रभावी किंमत आणखी कमी होते. ग्राहकांना तीन महिन्यांपर्यंत नो-कॉस्ट EMI चे पर्याय देखील दिले जात आहेत. हा स्मार्टफोन Amazon आणि Xiaomi च्या ऑनलाइन स्टोअरवर ब्लॅक, मिस्ट ब्लू आणि सनसेट ऑरेंज रंगांमध्ये उपलब्ध आहे.

डिस्प्ले आणि परफॉर्मन्समध्ये काय विशेष आहे?

Redmi A7 Pro 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 800 निट्स पर्यंत ब्राइटनेस असलेला 6.9-इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. हा फोन अँड्रॉइड 16 वर आधारित HyperOS 3 वर चालतो. कंपनीने चार वर्षांचे ओएस अपडेट्स आणि सहा वर्षांचे सुरक्षा अपडेट्स देण्याचे आश्वासन दिले आहे.

या फोनच्या परफॉर्मन्सबद्दल बोलायचे झाल्यास, यात 6nm प्रोसेसवर तयार केलेला युनिसॉक T8300 ऑक्टा-कोअर प्रोसेसर आहे. यात 4जीबी LPDDR4x रॅम आणि 128जीबी पर्यंत यूएफएस 2.2 स्टोरेज आहे, जे मायक्रोएसडी कार्डद्वारे 2टीबी पर्यंत वाढवता येते.

बॅटरी, कॅमेरा आणि कनेक्टिव्हिटी वैशिष्ट्ये

या स्मार्टफोनचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याची 6300mAh बॅटरी जीचा जास्त वेळ वापर सुनिश्चित करते. यात 15W वायर्ड चार्जिंग आणि 7W रिव्हर्स चार्जिंगलाही सपोर्ट आहे.

कॅमेऱ्याबद्दल बोलायचे झाल्यास, यात 32-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि एक सेकंडरी कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलसाठी 8-मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा उपलब्ध आहे.

कनेक्टिव्हिटी पर्यायांमध्ये 5G, 4G LTE, WiFi 5, Bluetooth 5.4, GPS, GLONASS, Galileo, USB OTG आणि एक Type-C पोर्ट यांचा समावेश आहे, ज्यामुळे हा एक ऑलराउंडर बजेट स्मार्टफोन बनतो.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.