'...तर कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी तो दहावेळा विचार करेल'; मराठी अभिनेत्रीनं बोलून दाखवली कायदे कडक करण्याची गरज
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क April 16, 2026 09:13 AM

Pooja Sawant On Women Safety: मराठी इंडस्ट्रीतली (Marathi Film Industry) मोस्ट कलरफुल अभिनेत्री कोण? असं कुणालाही विचारलं तरी, अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant)  हेच नाव सर्वजण घेतात. आजवर पूजानं अनेक मराठी आणि हिंदी सिनेमांमधून प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय.  पूजा सावंत (Marathi Actress Pooja Sawant) ही तिच्या अभिनयानं आणि ग्लॅमरस स्टाईलनं प्रेक्षकांची मनं जिंकते. पूजा ही मराठी चित्रपटसृष्टीतील (Marathi Movies) प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेनं वाट बघत असतात. अशातच सध्या ती तिचा आगामी सिनेमा 'सालबर्डी'मुळे (Salbardi Movie) चर्चेत आहे. पूजा सावंत सध्या याच सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याच निमित्तानं तिनं नुकतीच मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना तिनं महिला सुरक्षा आणि स्त्रियांवरील अत्याचारावर भाष्य केलं. तसेच, तिला प्राण्यांवरील क्रौर्याबाबतचे कायदे बदलायचे आहेत, असंही तिनं सांगितलं.  

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत हिनं नुकतीच आपल्या आगामी सिनेमाच्या पार्श्वभूमीवर 'आरपार' या युट्यूब चॅनलला मुलाखत दिली. या मुलाखतीत बोलताना मराठी अभिनेत्री पूजा सावंत म्हणाली की, "सर्वात आधी 'ॲनिमल क्रुएल्टी' म्हणजे प्राण्यांवरील क्रौर्याबाबतचे कायदे बदलायचे आहेत. आपल्याकडे प्राण्यांना इजा पोहचवणाऱ्यांविरुद्ध कोणताही कडक कायदा नाही. जर तुम्ही एखाद्या प्राण्याला दुखापत केली आणि तुमच्यावर केस झाली, तर तुम्ही केवळ 50 रुपये दंड भरून पोलीस स्टेशनमधून आरामात बाहेर येऊ शकता. इतका तो सोपा आणि कमकुवत कायदा आहे. जर मी पोलीस ऑफिसर असते, तर हा कायदा नक्कीच बदलला असता..."

 
 
 
 
 
View this post on Instagram
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by सालबर्डी मराठी चित्रपट (@salbardifilm)

...तर तो कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी दहावेळा विचार करेल : पूजा सावंत 

मुलाखतीत पुढे बोलताना अभिनेत्री पूजा सावंत हिनं महिलांच्या सुरक्षेवरही आपलं मत मांडलं, महिला सुरक्षा आणि स्त्रियांवरील अत्याचाराबाबत बोलताना पूजा सावंत म्हणाली की, "दुर्दैवानं आजही भारतात स्त्रियांवर जे अत्याचार होत आहेत, ते पाहून खूप वेदना होतात. यासाठी मला कायदे अधिक कडक करायला आवडतील. जर गुन्हेगाराला माहीत असेल की, शिक्षा तात्काळ आणि अत्यंत भयानक मिळणार आहे, तर तो कोणत्याही स्त्रीला हात लावण्यापूर्वी दहावेळा विचार करेल..."

पूजा सावंतनं बोलताना सांगितलं की, गुन्हेगारी कमी करण्यासाठी गुन्हेगाराच्या मनात कायद्याचा धाक असणं सर्वात महत्त्वाचं आहे. पुढे बोलताना म्हणाली की, "भीती जर गुन्हेगाराच्या मनात असेल, तर अशा गुन्ह्यांचे प्रमाण नक्कीच कमी होईल. म्हणून शिक्षेची तरतूद करण्यावर मी प्रामुख्याने काम केलं असतं...", असं पूजा सावंत म्हणाली.

दरम्यान, अभिनेत्री पूजा सावंत सध्या तिचा आगामी सिनेमा 'सालबर्डी'मुळे चर्चेत आहे. या सिनेमात पूजा सावंत अत्यंत महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहे. सिनेमात पूजानं एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारली आहे. पूजाचा हा आगामी सिनेमा येत्या 17 एप्रिल रोजी रिलीज होणार आहे. 

अपूर्वा नेमळेकर मॅट्रिमोनी साईट्स पाहून वैतागली, भाचीनं रिक्वेस्ट पाठवली अन् भेटताक्षणी जोडी जुळली; अपूर्वा-तनुजच्या 'दुसऱ्या लग्नाची गोष्ट'

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.