Gold Price Today : अक्षय्य तृतीयेला खरेदी करता येणार की नाही ? सराफा बाजारात मोठी घडामोड, आजचे सोन्याचे दर..
Tv9 Marathi April 16, 2026 12:45 PM

अक्षय्य तृतीया.. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या या दिवशी बहुतांश लोकं आवर्जून सोनं खरदी करतात. अगदी खूप जमलं नाही तरी शुभ म्हणून थोडं तरी सोनं या दिवशी विकरत घेतलं जातं. हाच अक्षय्य तृतीयेचा दिवस आता जवळ आला आहे. मात्र सराफा बाजारात होणाऱ्या घडामोडी आणि सोनं-चांदीचे गगनाला भिडलेले भाव पाहून सोनं विकत घ्यायचं तर कसं असा प्रश्न अनेकांना पडला आहे. दरम्यान अक्षय्य तृतीयेला अजून काही दिवस बाकी असतानाच आज गुरूवार, 16 एप्रिल रोजी सोन्याचे दर समोर आले आहेत. देशांतर्गत बाजारात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मौल्यवान धातू स्वस्त झाला की महागला, ते जाणून घेऊया.

सध्या देशात सोन्याच्या दरात तेजी कायम आहे. गुरूवार, 16 एप्रिलच्या सकाळी, राजधानी दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,55,510 रुपयांपर्यंत वाढला आहे. मुंबईत हा भाव प्रति 10 ग्रॅम 1,55,360 रुपये इतका झाला आहे. आदल्याच दिवशी, दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 3000 रुपयांनी म्हणजेच सुमारे 2 टक्क्यांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 1,58,000 रुपयांवर पोहोचला होता. अक्षय तृतीयेच्या सणापूर्वी दागिने विक्रेते आणि साठेदार चांगली खरेदी करत आहेत.

अक्षय तृतीया हा मौल्यवान धातू खरेदी करण्यासाठी एक शुभ दिवस मानला जातो. यावर्षी हा सण रविवारी, 19 एप्रिल रोजी आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट गोल्डचा भाव प्रति औंस 4,795.97 डॉलर आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संघर्ष संपवण्यासाठी करार होण्याची आशा पुन्हा पल्लवित झाली आहे. इस्रायल, अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्ध 28 फेब्रुवारी 2026 रोजी सुरू झाले. त्यामुळे सोन्याचे भाव सतत वरखालीच होत होते. याशिवा डॉलरची कमजोरी हे देखील सोन्याच्या भाववाढीचे एक महत्त्वाचे कारण आहे.

देशातील प्रमुख शहरांमधील सोन्याचे रेट घ्या जाणून

दिल्लीतील सोन्याचा भाव: दिल्लीत 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,55,510 रुपये आहे. 22 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं हे 1,42, 560 रुपयांना मिळत आहे.

मुंबई आणि कोलकाता: सध्या मुंबई आणि कोलकातामध्ये 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,40,090 रुपये, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,55,360 रुपये आहे.

चेन्नईमध्ये सोन्याचा भाव: 24 कॅरेट सोन्याचा भाव ₹1,56,230 प्रति 10 ग्रॅम इतका असून 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमसाठी 1,43,210 रुपये मोजावे लागतील.

पुणे आणि बंगळूरुमधील दर: ​​या दोन्ही शहरांमध्ये, 24 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,55,360 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याचा दर प्रति 10 ग्रॅम 1,40,090 रुपये आहे.

शहर 22 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹) 24 कॅरेट सोन्याचे आजचे दर (₹)
दिल्ली 142560 155510
मुंबई 142410 155360
अहमदाबाद 142460 155410
चेन्नई 140990 156230
कोलकाता 142410 155360
हैदराबाद 142410 155360
जयपुर 142560 155510
भोपाळ 142460 155410
लखनऊ 142560 155510
चंदीगड 142560 155510

चांदीच्या दरांची स्थिती काय ?

एकीकडे सोन्याच्या किमतींनी डोक वर काढलेलं असताना, आज चांदीची चमकही वाढली आहे. 16 एप्रिलच्या सकाळी चांदीचा भाव वाढलेला दिसत आहे, 1 किलो चांदी ही 2 लाख 70 हजार 100 रुपये आहे. एक दिवसापूर्वी, दिल्ली सराफा बाजारात चांदीचे दर 11,800 रुपयांनी, म्हणजेच 4.81 टक्क्यांनी वाढून 2,57,000 रुपये प्रति किलोग्राम झाले. आंतरराष्ट्रीय बाजारात स्पॉट चांदीचा भाव प्रति औंस 78.61 डॉलर आहे. सध्या चांदी महाग झाली असली, तरी जानेवारीत जेव्हा त्याचा भाव 4 लाखांच्या पार पोहोचला होता, त्या उच्चांकाच्या तुलनेत चांदी सध्या स्वस्त दिसत आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.