Maharashtra rain forecast : सांगली जिल्ह्यात येत्या काही दिवसांत हवामानात मोठा बदल होण्याची शक्यता असून शुक्रवारपासून (ता. १७) पावसाला सुरुवात होणार आहे. रविवारी (ता. १९), सोमवारी (ता. २०) पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान अभ्यासक रमेश जाधव यांनी व्यक्त केली आहे.
त्यांनी सांगितले की, शुक्रवारी व शनिवारी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडू शकतो. दुपारनंतर किंवा सायंकाळी मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि वाऱ्यासह सरी कोसळण्याची शक्यता आहे. सर्व तालुक्यांमध्ये पावसाची तीव्रता समान राहणार नाही, मात्र अनेक भागांत ढगाळ वातावरण निर्माण होईल.
दरम्यान, १९ आणि २० एप्रिलदरम्यान पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामानविभागाने वर्तवली आहे. या कालावधीत जिल्ह्यात बऱ्यापैकी चांगला पाऊस होण्याची शक्यता असून जवळपास सर्व तालुक्यांमध्ये त्याचा प्रभाव जाणवेल. तसेच एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यातही अधूनमधून पावसाची शक्यता कायम राहील.
Maharashtra Weather Alert : पाऊस अन् गारपिटीचा तडाखा ओसरला, राज्यात आता उष्णतेची लाट; 'या' ६ जिल्ह्यांना अलर्ट जारीशेतकऱ्यांनी ही घ्यावी दक्षता...
कापणी केलेले पीक सुरक्षित ठेवावे. उदाहरणार्थ- गहू, मका
द्राक्ष, डाळिंब, भाजीपाला संरक्षण- पिकांवर बुरशीजन्य रोग प्रतिबंधात्मक उपाय करा
वीज व मेघगर्जनेपासून सावध राहा : शेतात काम करताना झाडाखाली थांबणे टाळा
सिंचन नियोजन करा : पावसाच्या शक्यतेने अनावश्यक पाणी देणे टाळा
खत, औषध फवारणी पुढे ढकला : हवामानस्थिरावल्यावरच फवारणी करा
पशुधनाची काळजी घ्या : जनावरांना कोरड्या, सुरक्षित ठिकाणी बांधा