Maharashtra Vidhan Parishad Election 2026: महाराष्ट्र विधान परिषदेच्या 9 जागांसाठी निवडणूक जाहीर (Maharashtra Vidhan Parishad Election 2026) करण्यात आली आहे. विधान परिषदेच्या 9 जागांसाठी नियमित निवडणूक तर एका जागेची पोटनिवडणूक पार पडणार आहे. भारत निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधान परिषदेच्या 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. 12 मे रोजी सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान होईल. तर 12 मे रोजीच निकाल जाहीर होणार आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला एक जागा येणार असून ही जागा कोणत्या पक्षाला मिळणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आता यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मोठं वक्तव्य केलंय.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, राज्यसभा निवडणुकीवेळी चर्चा झाली होती. उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जात असतील तर आमचा पाठिंबा असेल. मात्र, इतर प्रस्ताव असेन तर चर्चा करण्याची गरज आहे. सातव यांची जागा ही आमची होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संस्कृती सांगितली होती, आम्ही त्याला होकारही दिला होता. त्यामुळे राजीव सातव यांची जी जागा आहे, ती त्यांनी आता संस्कृती दाखवत काँग्रेसला द्यायला हवी, असे त्यांनी म्हटले आहे.
1. उद्धव ठाकरे (शिवसेना - उबाठा)
2. नीलम गोऱ्हे (शिवसेना)
3. शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी - शरद पवार गट)
4. अमोल मिटकरी (राष्ट्रवादी - अजित पवार गट)
5. गोपीचंद पडळकर (भाजप)
6. रणजितसिंह मोहिते-पाटील (भाजप)
7. राजेश राठोड (काँग्रेस)
8. प्रवीण दटके (भाजप)
9. रमेश कराड (भाजप)
दरम्यान, विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 मतांची जुळवाजुळव करावी लागेल, जे सध्याच्या स्थितीत कठीण दिसत आहे.
निवडणुकीची अधिसूचना जारी करणे : 23 एप्रिल, 2026
उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस: 30 एप्रिल 2026
उमेदवारी अर्जांची छाननी: 2 मे 2026
उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख: 4 मे 2026
मतदानाची तारीख: 12 मे 2026
मतदानाची वेळ: सकाळी 9 वाजेपासून ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत आहे.
मतमोजणी: 12 मे 2026 संध्याकाळी 5 वाजता
निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम तारीख: 13 मे 2026
आणखी वाचा