धक्कादायक! जालन्यात बँकेची 23 कोटी 33 लाखांची फसवणूक, खोटा शेतीमाल दाखवून 177 जणांच्या नावे उचललं कर्ज
रवी मुंडे, एबीपी माझा April 16, 2026 08:13 PM

Jalna Crime News : जालन्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. जालन्यातील मोतीराम अग्रवाल मर्चंड कोऑपरेटिव्ह बँकेत 23 कोटी 33 लाखांची फसवणूक झाली आहे. अस्तित्वात नसलेला शेतीमाल दाखवून आरोपीने 177 जणांच्या नावे 23 कोटी 33 लाखांचे कर्ज उचलले आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी रायचंद कुरंगळ नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. न्यायालयानं आठ दिवसांची पोलीस कोठडी सुावली आहे.

177 जणांच्या नावाने तब्बल 23 कोटी 23 लक्ष रुपयाचे बनावट कर्ज काढून बँकेची फसणूक

जालन्यातील मोतीराम अग्रवाल मर्चंड कोऑपरेटिव्ह बँकेत 177 जणांच्या नावाने तब्बल 23 कोटी 23 लक्ष रुपयाचे बनावट कर्ज काढून बँकेची फसणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. वेअर हाउसमध्ये अस्तित्वात नसलेल्या माल दाखवून आरोपीने 177 जणांच्या नावावर हे कर्ज घेतल्याचा प्रकार समोर आलाय, या प्रकरणी बँक मॅनेजरच्या तक्रारीवरून आरोपी रायचंद कुरंगळ नावाच्या व्यक्तीला अटक करण्यात आलय, सदर आरोपीला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने त्याला आठ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

बँकेतील हा कर्जाचा घोटाळा गेल्या 5 वर्षापासून सुरु असल्याची माहिती

दरम्यान बँकेतील हा कर्जाचा घोटाळा गेल्या 5 वर्षापासून सुरू होता अशी माहिती मिळत असून यात बँकेतील लोक देखील असल्याचा संशय आहे. बँकेतील या प्रकरणी रिझर्व बँकेने 10 एप्रिल रोजी या बँकेवर सहा महिन्याचे निर्बंध लादले असून , या घोटाळ्याचा आकडा वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जातेय. दरम्यान या प्रकरणाची आर्थिक गुन्हे शाखेकडून सखोल तपासणी होत आहे.

आरबीआयनं घातले निर्बंध 

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं बँकिंग नियमन कायदा 1949 चा वापर करत मोतिराम अग्रवाल जालना मर्चंटस को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडवर निर्बंध घातले आहेत. हे निर्बंध 10 एप्रिल 2026 ला बँकेचं कामकाज संपल्यापासून लागू झाले आहेत. बँकेची आर्थिक स्थिती बिघडल्यानं आरबीआयनं हा निर्णय घेतला आहे. आरबीआयनं या बँकेवर निर्बंध टाकल्यानं 10 एप्रिलनंतर या बँकेला आरबीआयच्या लेखी परवानगीशिवाय नवी कर्ज देणे, गुंतवणूक करणे, ठेवी स्वीकारणे यास मनाई करण्यात आली आहे. याशिवाय बँकेस त्यांच्याकडील मालमत्तेची विक्री करणे, देणी देणे यास मनाई करण्यात आली आहे. आरबीआयनं घातलेल्या निर्बंधांची माहिती बँकेत दर्शनी भागात ठेवीदार, ग्राहकांच्या माहितीसाठी लावण्यात यावी. याशिवाय ही माहिती बँकेच्या वेबसाईटवर देखील द्यावी, असं आरबीआयच्या आदेशात सांगण्यात आलं आहे. बँकेकडे सध्या असलेल्या ठेवींपैकी काही रक्कम काढण्यास देखील मनाई करण्यात आली आहे. मात्र, आरबीआयच्या निर्देशानुसार ठेवींमधील रकमेचा वापर कर्ज भरण्यास करायचा असल्यास करता येऊ शकतो. बँकेची आर्थिक स्थिती कमजोर झाल्यानं आरबीआयनं निर्बंध घातले आहेत. 

RBI : आरबीआयकडून महाराष्ट्रातील एका बँकेवर सहा महिन्यांसाठी निर्बंध, पैसे काढणे, ठेवी स्वीकारण्यास मनाई, कारण समोर

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.