धर्मांतरणावरून वाद पेटला, TCS कडून कर्मचाऱ्यांना आनंदवार्ता, सगळ्यांचीच नोकरी वाचली, पगाराविषयी सर्वात मोठा निर्णय
GH News April 16, 2026 06:13 PM

Tata Consultancy Services: देशातील सर्वात मोठी सॉफ्टवेअर कंपनी टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेज (TCS) सध्या एका वेगळ्याच प्रकरणाने गाजत आहे. नाशिक येथील कार्यालयात धर्मांतरण आणि महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रकरणात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर एचआर निदा खान फरार आहे. हा वाद उफाळला असतानाच कंपनीने कोणत्याही कर्मचार्‍याला आता काढले जाणार नसल्याचे जाहीर केले आहे. आता कंपनी स्टँडर्ड इंक्रीमेंट सायकलवर परतली आहे. म्हणजे पगार वाढीसाठी वाट पाहावी लागणार नाही अथवा आहे त्या पगारात काम करावे लागणार नाही. TCS ने हा निर्णय 1 एप्रिलपासून लागू केला आहे.

गेल्यावर्षी नोकरीवरून काढण्याचा निर्णय

गेल्यावर्षी 2025 च्या जुलै महिन्यात कंपनीने मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपातीचे शस्त्र उगारले होते. एकूण कर्मचाऱ्यांपैकी जवळपास 12,261 कर्मचार्‍यांना घरी पाठवण्यात येणार होते. स्ट्रक्चरल रिस्ट्रक्चरिंग आणि AI (Artificial Intelligence) साठी ही कपात सुरू होती. कंपनीच्या या निर्णयामुळे अनेक कर्मचारी असुरक्षित झाले होते. त्यांना पगारवाढ सोडा नोकरी टिकणार की नाही याची भीती वाटत होती. तर याच धोरणाचा वापर करत नाशिकमध्ये धर्मांतरण आणि लैंगिक शोषण करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे. कर्मचार्‍यांना नोकरीवरून काढण्याची नेहमी भीती दाखवून ही टोळी त्यांना लुबाडत असल्याचा आरोप करण्यात येत आहे.

का घेतला कंपनीने हा निर्णय?

टीसीएस कंपनीचे सीईओ के. कृतिवासन यांच्यानुसार, कंपनीची आर्थिक स्थिती मजबूत आहे. जागतिक बाजारात कंपनीने चांगली मांड ठोकली आहे. TCS कंपनीने चौथ्या तिमाहीत 13718 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे. गेल्या वर्षीच्या समान तिमाहीतील नफ्यापेक्षा हा 12.2 टक्क्यांनी जास्त आहे. तर कंपनीचा महसूल हा 9.6 टक्क्यांनी उसळून 70698 कोटी रुपयांवर पोहचला आहे. कंपनीने गेल्या काही कालावधीत 12 अब्ज डॉलरचे नवीन करार केले आहे. त्यात अनेक मोठे करार सुद्धा आहे.

कामाच्या कामगिरी आधारे कंपनीत कर्मचाऱ्यांचा पगार वाढतो. आकडेवारीनुसार, जबरदस्त काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुप्पट पगार वाढ मिळण्याची शक्यता आहे. रेटिंग आणि ग्रेड आधारे इतर कर्मचाऱ्यांना पगार वाढ देण्यात येईल. ही पगारवाढ साधारणपणे 4.5 टक्के ते 7 टक्क्यांपर्यंत होणार आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.