Pankaja Munde Chandrapur चंद्रपूर : प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी चंद्रपुरात (Chandrapur) आलेल्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे(Pankaja Munde) यांची गाडीf प्रदूषणामुळे काळी झाल्याचं बघायला मिळालंय. पंकजा मुंडे यांनी घुग्गुस परिसरातल्या 2 कोल वॉशरिंची पाहणी केलीया दोन कोल वॉशरीमधून जाताना त्यांच्या गाडीवर कोळशाची प्रचंड धूळ बसली. विशेष म्हणजे मंत्री महोदयांचा दौरा असल्यामुळे या कोल वॉशरीची पूर्णपणे स्वच्छता करण्यात आली होती. मात्र, स्वच्छतेनंतरही पंकजा मुंडे यांच्या गाडीचा रंग खऱ्या अर्थाने चंद्रपूरच्या प्रदूषणाची पातळी सांगतोय. मंत्र्यांच्या गाडीची अवस्था पाहून आता तरी प्रशासन चंद्रपूरच्या प्रदूषणावर लगाम लावणार का? हाच खरा प्रश्न आता पडतोय. (पंकजा मुंडे चंद्रपुरात)
पंकजा मुंडे: पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे 3 दिवसाच्या चंद्रपूर दौऱ्यावर, कोळसा हाताळणी प्रकल्पाला भेट
दरम्यानपर्यावरण मंत्री पंकजा मुंडे 3 दिवसाच्या आपल्या कार्यरत दौऱ्यावर आज चंद्रपुरात पोचल्या. यावेळी भाजप नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्यासह त्यांनी दुर्गापूर भागातील चंद्रपूर थर्मल पावर स्टेशनच्या कोळसा हाताळणी प्रकल्पाला भेट देत पाहणी केली. नंतर या भागातील नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी प्रदूषण कमी करण्यासाठी कार्यरत राहीएलअसे आश्वासन दिले. मंत्री येणार म्हणून प्रदूषण नियंत्रण विषयक उपाययोजना राबविल्या जात आहेत, हे मला माहित आहे, असा टोला ही त्यांनी प्रशासनाला यावेळी लगावला.
Pankaja Munde in Chandrapur: पंकजा मुंडे यांच्या चंद्रपूर भेटीचे कारण काय?
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आजपासून तीन दिवसाच्या चंद्रपूर दौऱ्यावर आहेत. पंकजा मुंडे यांच्या चंद्रपूर भेटीचे कारण हे चंद्रपूर जिल्ह्यातील वाढतं प्रदूषण असलं तरी सर्वांच्या नजरा या भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि पंकजा मुंडे यांच्या भेटीवरच असणार आहेत. पंकजा मुंडे यांनी नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि स्वतः च्या भाजप सरकारला लक्ष्य केलं होतं. तर दुसरीकडे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार देखील आपल्याच सरकारचे सर्वात मोठे टीकाकार म्हणून गेल्या काही महिन्यात समोर आले आहेत. भाजपमधले अतिशय ज्येष्ठ आणि जुने असलेले हे दोन्ही नेते आपल्याच सरकार विरोधात अनेक वेळा टीका करताना पाहायला मिळाले आहेत आणि आज हे दोन नेते सोबत असल्याने राजकीय जाणकारांच्या भुवया उंचावल्या आहेत.
विशेष म्हणजे राज्यात आणि केंद्रात भाजपचे सरकार असताना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील प्रदूषणाचा मुद्दा विधानसभेत मोठ्या हिरीरीने मांडला होता. आणि यावर उत्तर देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी विधानसभेचे अधिवेशन संपताच आठ दिवसात मी चंद्रपूर जिल्ह्याचा दौरा करणार, अशी घोषणा केली होती. त्याप्रमाणे पंकजा मुंडे दिवसभर चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक उद्योगांचा प्रदूषणाच्या दृष्टीने दौरा करणार आहेत. मात्र, त्यांचा हा दौरा फक्त प्रदूषणाची पाहणी करण्यासाठी आहे की भविष्यातील राजकीय समीकरणांचा देखील यामध्ये काही उहापोह होतो हीच चर्चा आता राजकीय जाणकारांमध्ये रंगणार आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा