वसई किल्ल्याला दुर्गप्रेमींची भेट
जंजिरे-अर्नाळा किल्ल्यात स्मरणदिनी मानवंदना
वसई, ता. १६ (बातमीदार) ः किल्ले वसई मोहीम परिवारअंतर्गत जंजिरे-अर्नाळा २८९व्या स्मरणदिन करण्यात आला. यानिमित्ताने जंजिरे-अर्नाळा किल्ल्याला ३१ दुर्गमित्रांनी भेट दिली आहे.
किल्ले वसई मोहीम परिवारअंतर्गत जंजिरे-अर्नाळा स्मरणदिन विविध उपक्रमांनी करण्यात येतो. यानिमित्ताने इतिहास अभ्यासक श्रीदत्त राऊत यांनी दुर्गप्रेमींना सफर घडवली. या मोहिमेत समग्र जंजिरे-अर्नाळा किल्ला वास्तुविशेष अभ्यास भटकंती, गडदेवता पूजन व दर्या पूजन, जंजिरे-अर्नाळा आरमार मानवंदना, जंजिरे-अर्नाळा ऐतिहासिक संदर्भ, किल्ले इतिहास मार्गदर्शन सफर, श्री त्रंबकेश्वर महादेव ओळख, जंजिरे-अर्नाळा संवर्धन आवश्यकता, जंजिरे-अर्नाळा विशेष संशोधन मार्गदर्शन, किल्ल्यातील पीर दर्गा कागदपत्रे श्री आदिशक्ती भवानी कालिका मंदिर इतिहास मार्गदर्शन, पोर्तुगीजकालीन नकाशे तपशील अशा विविध उपक्रमातून दुर्गप्रेमींना मार्गदर्शन करण्यात आले.
--------------------
इतिहासाला उजाळा
डोंबिवलीतील दुर्गमित्र समीर सुधीर भिडे यांनी वसई परिवाराचा हा उपक्रम खरोखरच प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तर इतिहास मार्गदर्शन, संकलन, संवर्धन, संशोधन सर्वच माध्यमातून जंजिरे-अर्नाळा किल्ल्याच्या इतिहासाला उजाळा मिळाल्याचे स्थानिक दुर्गमित्र अभिषेक निजाई म्हणाले.