17 एप्रिलला होणाऱ्या त्रिग्रही योगाचा 5 राशींना होणार फायदा; लक्ष्मीमातेच्या कृपेने अडचणींपासून मुक्तता
esakal April 17, 2026 03:45 AM

Tomorrow Rashi Bhavishya In Marathi : उद्या शुक्रवारी 17 एप्रिलला पाच राशी भाग्यशाली ठरणार आहेत. चंद्राचं संक्रमण मीन राशीतून मेष राशीत होईल. त्यामुळे गजकेसरी योग तयार होणार आहे. तर मध्यान्हानंतर सूर्य मेष राशीत प्रवेश करेल. शुक्र आधीच मेष राशीमध्ये स्थित आहे. त्यामुळे चंद्र,सूर्य आणि शुक्राची युती होऊन त्रिग्रही योग निर्माण होतोय.

उद्या शुक्रवार आहे. उद्याची देवता माता लक्ष्मी आहे. यामुळे पाच राशींवर माता लक्ष्मीची कृपा होऊन आर्थिक, वैयक्तिक आणि सामाजिक गोष्टींमधील अनेक फायदे या राशींना मिळणार आहेत. कोणत्या आहेत या राशी जाणून घेऊया.

मेष रास :

मेष राशीसाठी उद्याचा दिवस आनंदाचा जाईल. उद्या त्रिग्रही योग तुमच्या राशीत बनल्यामुळे तुम्ही आनंदी असाल. मित्रांची मदत होईल. तुम्ही उद्या काहीतरी क्रिएटिव्ह काम कराल. जोडीदाराबरोबर रोमँटिक वेळ घालवाल. स्वतःसाठी सुख-सोयीच्या वस्तूंची खरेदी कराल.

उपाय - उद्या नदी किंवा तलावामध्ये बत्ताशे अर्पण करा.

मिथुन रास :

उद्या तुम्हाला दिवस उत्तम जाईल. तुमच्या दहाव्या आणि अकराव्या घरात चंद्राचं संक्रमण असेल. त्यामुळे वाढत्या आर्थिक खर्चांवर तुम्ही नियंत्रण आणू शकाल. उद्या तुम्हाला अपेक्षेपेक्षा अधिक लाभ होईल. जे लोक वस्त्र आणि साजशृंगाराच्या व्यवसायात आहेत त्यांना उद्या चांगलं यश मिळेल. नवीन काम सुरु कराल. उद्या तुम्हाला एखादी भेट मिळेल.

उपाय - उद्या श्रीविष्णू चाळीसेचे पठण करा. तांदूळ दान करा.

सिंह रास :

उद्या सूर्य, शुक्र आणि चंद्राच्या युतीचा तुम्हाला लाभ होईल. वडिलांची साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचं सहकार्य लाभेल. सामाजिक कार्यात सहभाग घ्याल. एखादा सन्मान प्राप्त कराल. भौतिक सुखांची लालसा वाढल्यामुळे बजेटच्या बाहेरील वस्तूंची खरेदी कराल. तुमच्या जवळच्या व्यक्तींबरोबर तुम्ही चांगला वेळ घालवाल. एखादी आनंदाची बातमी मिळेल.

उपाय - उद्या सूर्याला तांब्यातून जल अर्पण करा.

तूळ रास :

उद्या तुम्हाला कामात यश मिळेल. समाजात ओळख वाढेल. एखादे नवीन काम सुरु कराल. नवीन प्रोजेक्टची सुरुवात कराल. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमचा सन्मान होईल. तुमचे सहकारी तुम्हाला मदत करतील. आवडीचे जेवण जेवायला जाल. शेजारी आणि मित्रांबरोबर चांगला वेळ घालवाल.

उपाय - उद्या कमळगट्ट्याच्या माळेवर ओम ह्रीं स्रीं कमला कमलालयै नमः मंत्राचा जप करा.

मकर रास :

उद्या शुक्रवारी मकर राशीसाठी हा दिवस प्रगतीचा असेल. तुम्हाला तुमच्या प्रयत्नांमध्ये यश मिळेल. उद्या तुम्ही थोडे भावूक व्हाल. वाहन खरेदीचा योग संभवतो. एखादा छोटा प्रवास कराल. नोकरीत दिवस चांगला जाईल. आईसोबत वेळ घालवाल. उद्या एखादे सरप्राईज मिळेल.

उपाय - उद्या तांदूळ आणि साखरेचे दान करा.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.