Mumbai Indians Collapse Again! 5 Key Reasons Behind Their Defeat vs PBKS:मुंबई इंडियन्सला इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मध्ये गुरुवारी पंजाब किंग्सकडून दारूण पराभव पत्करावा लागला. पाचवेळच्या आयपीएल विजेत्या मुंबईचा हा सलग चौथा पराभव ठरला.. पंजाब किंग्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्मा नसल्याने मुंबईवर आधीच दडपण होते, परंतु क्विंटन डी कॉकने त्याची उणीव जाणवू दिली नाही. क्विंटनच्या शतकाने संघाला १९६ धावांपर्यंत पोहोचवले, परंतु ते २०-२५ धावांनी कमी पडले. त्यानंतर गोलंदाजीत व क्षेत्ररक्षणातही त्यांना अपयश आले. पंजाब किंग्सविरुद्धच्या पराभवामागची कारणं जाणून घेऊयात..
रिकल्टन, सूर्याने केले निराश...फॉर्मात असलेल्या रोहित शर्माची गैरहजेरी मुंबई इंडियन्सच्या मानसिकतेवर परिणाम करणारी होती. त्यात सलग तीन पराभव पत्कराव्या लागल्याचं दडपण त्यांच्यावर होतेच.. रोहितच्या अनुपस्थितीत रायन रिकेल्टनकडून जबाबदारीने खेळ अपेक्षित होती, पंरतु दुसऱ्याच षटकात तो बाद झाला. पाठोपाठ पुढील चेंडूवर सूर्यकुमार यादव ( ०) माघारी परतला. सूर्यकुमारचे अपयश ही मुंबईची सर्वात मोठी डोकेदुखी ठरतेय. त्याने ५ सामन्यांत २१.२० च्या सरासरीने १०६ धावा केल्या आहेत. रिकेल्टनही ५ सामन्यांत २७.४० च्या सरासरीने १३७ धावाच करू शकला आहे.
MI vs PBKS Live: आई, शप्पथsss...! श्रेयस अय्यरचा अविश्वसनीय झेल पाहून रोहित शर्मा अवाक्... सूर्याचे डोळे विस्फारले... IPL2026 मधील बेस्ट कॅच नमन धीरची विकेट अन् नंतर लोटांगण..नमन धीरला फलंदाजीला वरच्या क्रमांकावर पाठण्याचा डाव यशस्वी ठरला आणि त्याने ( ५०) क्विंटन डी कॉकसह ६८ चेंडूंत १२२ धावांची महत्त्वाची भागीदारी केली. पण, नमनच्या विकेटनंतर मुंबईच्या तळाच्या फलंदाजांना क्विंटनला साथ देता आली नाही. हार्दिक पांड्या मैदानावर उभा होता, परंतु त्याने धावांची गती वाढवता आली नाही. तिलक वर्मा, शेरफाने रदरफर्ड व मयांक रावत यांना क्विंटनसोबत भागीदारी करता आलेली नाही.
हार्दिक पांड्याचे फसलेले डावपेच...जसप्रीत बुमराहसारखा मॅच विनिंग गोलंदाज संघात असताना हार्दिक त्याला पहिले षटक का देत नाही? हा सर्वांना पडलेला प्रश्न आहे. त्याने पहिले षटक दीपक चहरला दिले आणि पंजाबच्या सलामीवीरांनी २१ धावा चोपून मुंबईवर दडपण निर्माण केले. त्यानंतर जसप्रीत बुमराहला गोलंदाजीला आणले गेले. अल्लाह गझनफरने दोन विकेट्स घेत सामन्यात पुनरागमनाची संधी निर्माण करून दिली होती, परंतु हार्दिकला गोलंदाजीत योग्य बदल करता आले नाहीत.
जसप्रीत बुमराहचे अपयश..जसप्रीत सलग पाचव्या सामन्यात विकेट शिवाय राहिला. त्याने मागील पाच सामन्यांत ३५, २१, ३२, ३५ व ४१ अशा धावा दिल्या आणि त्याच्या नावावर एकही विकेट नाही. त्यात आज त्याने प्रभसिमरन सिंगचा ११ धावांवर असताना झेल टाकला आणि त्यानंतर सामन्यात पुनरागमन करणे मुंबईला अवघड झाले. शार्दूल ठाकूर ( १३.५७), गझनफर ( १०.३०), हार्दिक पांड्या ( ११.१६), ट्रेंट बोल्ट ( १२.२२), दीपक चहर ( १३.३८) यांची इकॉनॉमी मुंबईला विचार करायला लावणारी आहे.
IPL 2026 POINTS TABLE : पंजाब किंग्स टेबल टॉपर! मुंबई इंडियन्सचे घरच्यांसमोर वस्त्रहरण; चाहते हताश, रोहित शर्मा हतबल गचाळ क्षेत्ररक्षण...जसप्रीतच नव्हे, तर मुंबईची फिल्डिंग आज लाजीरवाणी राहिली. झेल टाकले. चौकार सोडले, अशा अनेक चुका पंजाबच्या पथ्यावर पडल्या आणि सामन्यानंतर हार्दिकने ते मान्यही केले. तो म्हणाला, खरं सागायचं, तर माझ्याकडे बोलण्यासारखे काहीच नाही.. वैयक्तिक कामगिरी,प्लानिंग, टीम म्हणून आम्ही कुठे कमी पडतोय, याचा विचार करायला हवा. पंजाब किंग्सने चांगला खेळ केला.