जालनात एका तरुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिला आई नसताना घरी बोलावून तिच्यावर अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
ALSO READ: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे दिल्लीत 'एकाच ताटात'? शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात भूकंप
सदर घटना जालनातील आहे. पीडित तरुणी आणि आरोपी एकाच महाविद्यालयात शिकतात. आरोपीने तरुणीशी ओळख केली. नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर आरोपी तरुणीला बुरखा घालून सगळीकडे फिरायला न्यायचा. आरोपीचे वडील बाहेर गावी कामाला असतात.तो आपल्या आईसह जालन्यात वास्तव्यास आहे.
ALSO READ: नाशिक टीसीएस प्रकरण: व्हॉट्सॲप ग्रुप्स आणि देवदेवतांवरील कमेंट्समधून नियोजन करण्यात आले, एसआयटी मोठी रहस्ये उघड करणार
एके दिवशी त्याची आई बाहेर गावी गेली. घरात आरोपी एकटाच होता. त्याने पीडित तरुणीला घरी आणले आणि तिच्यावर शारीरिक संबंध ठेवण्याचा दबाव टाकला. तिने नकार दिल्यावर लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. माझ्याशी लग्न केले नाही तर मी आत्महत्या करेन असं म्हणत त्याने पीडितेवर अतिप्रसंग केला.ALSO READ: लग्नाच्या रात्री वधू चोरी करून पळून जायची; अविवाहित पुरुषांना लक्ष्य करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
पीडित तरुणीने घरी आल्यावर घडलेले आपल्या आईला सांगितले नंतर त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. आरोपीच्या विरोधात पीडित तरुणीने तक्रार केली असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला 20 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस पुढील तपास करत आहे.
Edited By - Priya Dixit