कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावरुन हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, मालेगावात ठिय्या आंदोलन सुरु, प्रशासनाविरोधात घोषणाबाजी
संदीप जेजुरकर April 17, 2026 07:13 PM

Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगावात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत. कॉर्पोरेट जिहाद प्रकरणावरुन आंदोलन सुरु करण्यात आलं आहे. मोसम पुलावर कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. नाशिकमधील TCS प्रकरणावरुन संताप व्यक्त करण्यात येत आहे. आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी देखील करण्यात येत आहे. बजरंग दल, VHP, संघ व भाजप कार्यकर्त्यांनी ही मागणी केली आहे. 

मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी

कॉर्पोरेट जिहाद प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मालेगावात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत.  शहरातील मोसम पुलावर कार्यकर्त्यांनी जोरदार आंदोलन छेडले आहे. नाशिकमधील TCS कंपनीशी संबंधित प्रकरणावरून संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात तीव्र घोषणाबाजी केली. यावेळी मुख्य आरोपीला तात्काळ अटक करण्यात यावी, अशी ठाम मागणी आंदोलकांनी केली आहे. तसेच, भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना प्रोत्साहन मिळू नये यासाठी प्रशासनाने कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात बजरंग दल, विश्व हिंदू परिषद, संघ आणि भाजपचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. 

बीडमध्ये रखरखत्या उन्हात मुस्लिम समाज आरक्षणाची मागणी घेऊन रस्त्यावर; मुस्लिम समाज बांधवांना मराठा समाजाचा पाठिंबा

Anc:आरक्षणाची मागणी करत बीडमध्ये रखरखत्या उन्हात मुस्लिम समाज रस्त्यावर उतरलाय. बीडमध्ये निघालेल्या या मोर्चाला मराठा समाजाने पाठिंबा देत मोर्चात सहभागी झालेल्या समाज बांधवांसाठी नाष्टा आणि पाण्याची व्यवस्था केली आहे. आज पर्यंत मराठा समाजाच्या निघालेल्या प्रत्येक मोर्चात मुस्लिम समाजाचे मोठे योगदान राहीलंय त्यातून उतराई होण्याची हीच संधी असून मुस्लिम समाजाला देखील आरक्षण मिळावे अशी भूमिका मराठा समाजाने घेतलीय. छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून या मागणीला पाठिंबा आहे. मोर्चात सहभागी मराठा बांधवांशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधीने पाहुयात..

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.