Patralekha Reacts To Body Shaming After Pregnancy: अभिनेता राजकुमार रावची पत्नी अॅक्ट्रेस पत्रलेखा सध्या प्रचंड चर्चेत आहे. एकीकडे अभिनेत्री मातृत्व एन्जॉय करत आहे, तर दुसरीकडे पती राजकुमार रावचा आगामी 'टोस्टर' हा चित्रपट नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे. नुकतेच, अभिनेत्री पत्रलेखा आई झाल्यानंतर पहिल्यांदाच सार्वजनिक ठिकाणी स्पॉट झाली. तिचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. आई झाल्यानंतर पत्रलेखाचं वजन वाढलं आहे. ज्यामुळे तिला बॉडी शेमिंगला सामोरे जावे लागले आहे. दरम्यान, आता अभिनेत्रीने पापाराझींना सडेतोड उत्तर दिले आहे.
पत्रलेखा तिचा पती राजकुमार रावसोबत 'टोस्टर' चित्रपटाच्या स्क्रीनिंगला उपस्थित होती. तिला अलिकडेच बॉडी शेमिंगला सामारे जावे लागले आहे. दरम्यान, ट्रोल करणाऱ्यांना अभिनेत्रीने सडेतोड उत्तर दिलं आहे. इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करुन तिनं ट्रोल करणाऱ्यांना फटकारलं आहे. 'पॅप्स पेज! मला काय झालंय? मी नुकतंच एका बाळाला जन्म दिला आहे. माझं वजन वाढलं आहे. जे तुम्हा सर्वांना एक विचित्र गोष्ट वाटत आहे. मी बसून डोंगर खाल्लेला नाही. मी नुकतंच बाळाला जन्म दिला आहे. तसेच 2 चित्रपटांची निर्मितीही केली आहे. जी सोपी गोष्ट नाही', असं अभिनेत्री म्हणाली.
View this post on Instagram
'शक्य असते तर, मी आज अशी नसते. प्रेग्नेंसीमुळे माझे शरीर असे झाले आहे. देवासाठी कृपया दयाळू व्हायला शिका', असंही अभिनेत्री म्हणाली. सध्या तिची इन्स्टाग्राम स्टोरी सोशल मीडियात व्हायरल होत आहे. तिला ट्रोल करणाऱ्यांनाही काही नेटकऱ्यांनी धारेवर धरलं आहे.
पत्रलेखा आणि राजकुमार राव यांचे लग्न 15 नोव्हेंबर 2021 रोजी झाले आहे. गेल्या वर्षी 15 नोव्हेंबर 2025 रोजी पत्रलेखाने एका मुलीला जन्म दिला. विशेष म्हणजे पत्रलेखा तिच्या लग्नाच्या चौथ्या एनिव्हर्सीला आई झाली आहे. तिच्या मुलीचं नाव पार्वती पॉल राव असे आहे. सध्या अभिनेत्री आपलं मातृत्व एन्जॉय करत आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या: