"काही गोष्टी सिक्रेट ठेवलेल्याच बऱ्या" गुपचूप लग्नावर पहिल्यांदाच व्यक्त झाला गौरव "अजून काही ऑफिशियल नाही"
esakal April 17, 2026 08:45 PM

Marathi Entertainment News : मराठी इंडस्ट्रीमधील सध्याच्या चर्चेत असलेला अभिनेता म्हणजे गौरव मोरे. गौरवने नुकतंच नवीन घरात गृहप्रवेश केला. पण यापाठोपाठ गौरवने लग्न केल्याची बातमीही उघड झाली. प्रियांका कारेकरबरोबर गौरवचं लग्न झालं आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याने पहिल्यांदाच लग्नावर भाष्य केलं.

गौरवने इट्स मज्जा चॅनेलला मुलाखत दिली. यावेळी गौरवला त्याच्या लग्नाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. यावेळी अभिनेते पंढरीनाथ कांबळेही उपस्थित होते.

गौरवला लग्नाविषयी विचारल्यावर त्याने सांगितलं की,"काही गोष्टी असतात त्या सिक्रेट राहिलेल्याच चांगल्या असतात. वेळ आल्यावर मी त्यावर बोलेनच. त्यामुळे आता तरी यावर मी बोलणार नाही."

पॅडी कांबळे यांनी उत्तर दिलं की,"गौरवच्या मैत्रिणीविषयी मला माहिती होतं. आम्ही आता स्वित्झर्लंडला एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. तेव्हा ती सोडायला आली होती आणि त्यावेळी माझी तिच्याशी ओळख झाली. त्यावेळी मला रडू आलं. काही गोष्टी आपण जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत सांगत नाहीत. जेव्हा त्या गोष्टी अधिकृत होतील तेव्हा तो सांगेल."

पॅडी कांबळे आणि गौरव मोरे यांचा आऊट ऑफ सिलॅबल्स हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या सिनेमाचा म्युझिक लाँच नुकतंच पार पडला. त्यांचा हा सिनेमा लवकरच रिलीज होईल.

फक्त 50 रुपये दंड ! प्राण्यांविरुद्धच्या अत्याचारांवर अभिनेत्री पूजा सावंत व्यक्त "मी पोलीस ऑफिसर असते तर"
© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.