GT vs KKR : कॅप्टन गिलचा तडाखा, गुजरातची विजयी हॅट्रिक, कोलकाताचा पाचवा पराभव
GH News April 18, 2026 02:11 AM

शुबमन गिल याच्या नेतृत्वात गुजरात टायटन्सची आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमात (IPL 2026) पराभवाने सुरुवात झाली होती. गुजरातला आपल्या मोहिमेतील पहिल्या 2 सामन्यांत पराभूत व्हावं लागलं. मात्र त्यानंतर गुजरातने जोरदार कमबॅक केलं. गुजरातने 17 एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्सवर 5 विकेट्स विजय मिळवला. केकेआरने गुजरातसमोर 181 रन्सचं टार्गेट ठेवलं होतं. गुजरातने हे आव्हान 2 बॉलआधी पूर्ण केलं. गुजरातने 5 विकेट्स गमावून 181 रन्स केल्या. गुजरातने यासह विजयी हॅट्रिक पूर्ण केली. तर कोलकाताचा हा सलग तिसरा तर एकूण पाचवा पराभव ठरला. या पराभवामुळे केकेआरची सहाव्या सामन्यानंतरही पहिल्या वजियाची प्रतिक्षा कायम आहे.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.