Pune Police Bharti News: पोलिस भरती वैद्यकीय तपासणीत डमी उमेदवाराचा पर्दाफाश; ससून रुग्णालयातील प्रकारावर तिघींवर गुन्हा
esakal April 18, 2026 02:45 AM

पुणे : पोलिस भरतीच्या प्रक्रियेदरम्यान डोळ्यांच्या वैद्यकीय तपासणीत अपात्र ठरलेल्या एका महिला उमेदवाराने चक्क स्वतःऐवजी दुसऱ्या डमी तरुणीला तपासणीसाठी उभे केल्याचे उघडकीस आले आहे. ससून रुग्णालयात घडलेल्या याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी पोलिस मुख्यालयातील अंमलदार सुजाता राजू पवार यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघा महिलांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी (ता. १६) दुपारी ससून रुग्णालयात हा प्रकार घडला.

पोलिस भरतीतील एका महिला उमेदवाराची डोळ्यांची वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर, डॉक्टरांनी तिला अपात्र ठरवून केसपेपरवर ‘रेफर टू बोर्ड’ असा शेरा मारला होता. ही माहिती असतानाही, आरोपींनी संगनमत करून तिच्या केसपेपरवर डमी महिलेला डोळ्यांच्या तपासणीसाठी रांगेत उभे केले.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.