आयपीएल स्पर्धेच्या 19 व्या मोसमातील 27 व्या सामन्यात शनिवारी 18 एप्रिलला सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्स आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा या मोहिमेतील सहावा सामना असणार आहे. दोन्ही संघांनी 5 पैकी प्रत्येकी 3 सामने गमावले आहेत. तर 2 सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. त्यामुळे मोहिमेतील सहाव्या सामन्यात कोणता संघ तिसरा विजय मिळवणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.