Healthy Weekend Breakfast Hack: सकाळचा नाश्ता नेहमीच चविष्ट आणि पौष्टिक असावा असं वाटतं, पण रोज काय नवीन बनवायचं हा प्रश्नही अनेकांना पडतो. अशा वेळी ओट्सपासून बनणारा हा रंगीबेरंगी उत्तप्पम एक परफेक्ट पर्याय ठरतो. बाहेरून हलका कुरकुरीत, आतून मऊ आणि वरून ताज्या भाज्यांनी सजलेला हा उत्तप्पम फक्त पोट भरत नाही तर दिवसभर ऊर्जा देतो. विशेष म्हणजे, हा झटपट तयार होणारा पदार्थ आरोग्याची काळजी घेणाऱ्यांसाठीही एक स्वादिष्ट ट्रीट आहे. एकदा करून पाहिलात तर हा नाश्ता तुमच्या रोजच्या मेनूमध्ये नक्कीच जागा बनवेल.
साहित्य½ कप ओट्स
½ लहान कप रवा
½ लहान कप बेसन
1 टेबलस्पून लिंबाचा रस
चिमूटभर बेकिंग सोडा
चवीनुसार मीठ
1 बारीक चिरलेला कांदा
1 बारीक चिरलेला टोमॅटो
1 बारीक चिरलेली शिमला मिरची
1 हिरवी मिरची (चिरलेली)
2–3 टेबलस्पून कोथिंबीर
शिजवण्यासाठी तूप
सर्वात आधी ओट्स मिक्सरमध्ये टाकून बारीक पीठ तयार करा.
हे ओट्सचं पीठ गाळून एका भांड्यात घ्या.
त्यात रवा, बेसन, मीठ घाला आणि आवश्यकतेनुसार पाणी टाकून गुळगुळीत पीठ तयार करा.
तयार केलेलं पीठ 20 मिनिटं झाकून ठेवून द्या.
या वेळेत कांदा, टोमॅटो, शिमला मिरची, हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरून घ्या.
20 मिनिटांनंतर पीठ थोडं घट्ट झालेलं दिसेल, त्यामुळे गरजेनुसार पाणी घालून consistency adjust करा.
आता त्यात चिरलेल्या भाज्या आणि लिंबाचा रस मिसळा. हवं असल्यास भाज्या उत्तप्पमवर वरूनही टाकू शकता.
तवा गरम करून त्यावर थोडं तूप लावा आणि पीठ गोलसर पसरवा.
वरून भाज्या पसरवा आणि मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत शिजवा.
गरमागरम उत्तप्पम नारळ चटणी किंवा टोमॅटो चटणीसोबत सर्व्ह करा.