बंगालमध्ये सीमा चौकीला आग; बीएसएफ अधिकाऱ्याचा मृत्यू
Marathi April 18, 2026 12:25 PM

वृत्तसंस्था/ उत्तर 24 परगणा

पश्चिम बंगालच्या उार 24 परगणा येथे भारत-बांगलादेश सीमेवरील बीएसएफच्या एका बॉर्डर आउटपोस्टमध्ये आग लागल्याने एका अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. ही दुर्घटना हिंगलगंज भागातील ब्रांका बॉर्डर आउटपोस्टमध्ये घडली आहे. अधिकाऱ्यांनुसार आग लागण्यापूर्वी फ्यूल डेपोमध्ये विस्फोट झाला, ज्यानंतर वेगाने आग फैलावल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

या घटनेत सहाय्यक उपनिरीक्षक जगी राम हे डेपोमध्ये अडकून पडले आणि यामुळे त्यांचा मृत्यू झाला. हा फ्यूल डेपो सुंदरबनच्या नदी क्षेत्रांमध्ये गस्त घालणाऱ्या बीएसएफच्या नौकांसाठी इंधन उपलब्ध करवित होता. तर या दुर्घटनेत अन्य कुणी जखमी झालेले नाही असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. ही आउटपोस्ट बीएसएफच्या 77 व्या बटालियनच्या अंतर्गत येते.

© Copyright @2026 LIDEA. All Rights Reserved.