Why Akash Madhwal joined Chennai Super Kings squad Hyderabad? चेन्नई सुपर किंग्सची गाडी रूळावर आलेली असताना त्यांचा प्रमुख गोलंदाज खलील अहमद ( Khaleel Ahmed Injury) याने इंडियन प्रीमिअर लीग २०२६ मधून माघार घेतली. CSK चा वेगवान गोलंदाज नॅथन एलिस यापूर्वीच दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. महेंद्रसिंग धोनीही अद्याप दुखापतीमुळे खेळलेला नाही. आता खलीलही स्पर्धेतून बाहेर झाल्याने हा CSK साठी मोठा धक्का मानला जात आहे. पण, चेन्नईच्या पुढच्या सामन्यापूर्वी मोठा ट्विस्ट पाहायला मिळतोय.. काल मुंबई इंडियन्ससोबत असलेला नेट बॉलर आज चेन्नईच्या ताफ्यात दिसला. वानखेडे स्टेडियमवर सराव सत्रात तो रोहित शर्माचे पाय पडताना दिसला होता.
खलील अहमदला १४ एप्रिलला कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध खेळताना मांडीला दुखापत झाली होती. त्यामुळे त्याला पूर्ण ४ षटकेही टाकता आली नव्हती. तो मैदानातून गोलंदाजीदरम्यानच बाहेर गेला होता. आता त्याला उर्वरित स्पर्धेला मुकावे लागणार आहे, दुखापतीतून बाहेर येण्यासाठी त्याला १० ते १२ आठवड्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
IPL 2026 News: "हार्दिक पांड्याला कर्णधारपदावरून हटवा... रोहित शर्माकडे Mumbai Indians चं नेतृत्व पुन्हा सोपवा" खलील अहमदच्या जागी कोण?CSK चा पुढील सामना शनिवारी हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे. या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा नेट बॉलर आकाश मधवाल ( Akash Madhwal ) हा CSK च्या जर्सीत हैदराबाद येथे दिसला. त्यामुळे तो आता खलील अहमदच्या जागी चेन्नईकडून खेळणार असल्याच्या चर्चेचा सुरुवात झाली आहे. संघाच्या सीईओने सांगितले की, दुखापतग्रस्त खलील अहमदच्या बदली खेळाडूचा निर्णय घेण्यापूर्वी मधवाल आणि इतर काही गोलंदाजांना संधी दिली जाईल.
View this post on Instagram
आकाश हा CSK साठी चांगला पर्याय ठरू शकतो. त्याने आयपीएलमध्ये MI, RR चे प्रतिनिधित्व करताना १७ सामन्यांत २३ विकेट्स घेतल्या आहेत. आयपीएल २०२३ च्या लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या एलिमिनेटर सामन्यात त्याने ५ धावांत ५ बळी घेतले, जी आयपीएल प्लेऑफमधील सर्वोत्तम कामगिरी आहे.
त्याला नियम नीट समजावून सांगायला हवेत! BCCI च्या कारवाईपासून वैभव सूर्यवंशी वाचला; RR च्या टीम मॅनेजरसाठी शिक्षा ठरलीउत्तराखंडच्या रुरकी येथील आकाश क्रिकेटमध्ये येण्यापूर्वी तो सिव्हिल इंजिनिअर होता. वयाच्या २४ व्या वर्षापर्यंत तो फक्त टेनिस बॉल क्रिकेट खेळत असे. त्यानंतर त्याने लेदर बॉलने सराव सुरू केला. २०२२ मध्ये जखमी सूर्यकुमार यादवचा पर्याय म्हणून तो मुंबई इंडियन्स संघात सामील झाला. मुंबई इंडियन्समध्ये येण्यापूर्वी तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (RCB) आणि मुंबईसाठी नेट बॉलर म्हणून कार्यरत होता.