मुंबई: मुंबई महापालिकेने 122 अभियंत्यांच्या बदल्या (122 engineers transfers) अखेर रद्द केल्या आहेत. बदल्यांमध्ये कथित गैरव्यवहार आणि ‘ट्रान्सफर मार्केट’च्या आरोपांमुळे हा निर्णय घेण्यात आला. विशेष म्हणजे ऑक्टोबर 2025 मध्ये या बदल्या करण्यात आल्या होत्या, मात्र त्यानंतर तक्रारी, आक्षेप आणि चौकशीच्या मागण्यांमुळे संपूर्ण प्रक्रिया वादात सापडली होती. महापौर रितू तावडे यांनी या प्रकरणाची दखल घेत कारवाईची मागणी केल्यानंतर प्रशासन हललं. अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे यांच्याकडे हे प्रकरण पाठवण्यात आलं आणि अखेर 122 अभियंत्यांच्या बदली आदेश रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. (122 engineers transfers)
RTI कार्यकर्ते अनिल गलगली आणि भाजपचे शहराध्यक्ष अमित साटम यांनी या बदल्यांमध्ये भ्रष्टाचाराचे आरोप करत तक्रारी दाखल केल्या होत्या. त्यानंतर तत्कालीन आयुक्त भूषण गगराणी यांनी या बदल्यांना स्थगिती दिली होती. आता त्या बदल्या पूर्णपणे रद्द करण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे महापालिकेतील बदली प्रक्रियेतील पारदर्शकतेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.(122 engineers transfers)
एकीकडे हा निर्णय भ्रष्टाचारा विरोधातील कारवाई म्हणून पाहिला जात असला, तरी दुसरीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात झालेल्या बदल्या रद्द कराव्या लागणं, ही प्रशासनातील अनियमिततेची कबुली मानली जात आहे. दरम्यान, भविष्यातील बदली प्रक्रिया स्वतंत्र आणि पारदर्शक समितीमार्फत राबवावी, अशी मागणीही पुढे येत आहे. BMC मधील कथित ‘ट्रान्सफर मार्केट’चा मुद्दा आता आणखी तापण्याची चिन्हं आहेत.(122 engineers transfers)
मुंबई महानगरपालिकेतील अभियंत्यांच्या बदल्या अखेर रद्द केल्या आहेत. भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपांनंतर सहा महिन्यांपूर्वी स्थगित करण्यात आलेल्या १२२ हून अधिक नागरी अभियंत्यांच्या बदल्या पालिकेने अधिकृतपणे रद्द केल्या आहेत. या निर्णयामुळे पालिकेतील कथित 'बदल्यांच्या बाजाराला' मोठा फटका बसल्याचे मानले जात आहे.
ऑक्टोबर २०२५ मध्ये मुंबई महापालिकेतील १२२ अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले होते. मात्र, या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता आणि आर्थिक देवाणघेवाण झाल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली आणि भाजपचे मुंबई प्रदेशाध्यक्ष अमित साटम यांनी केला होता. या तक्रारींची दखल घेत तत्कालीन पालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी या बदल्यांना तातडीने स्थगिती दिली होती. या आठवड्यात जारी करण्यात आलेल्या पालिका आदेशात म्हटले आहे की, "ऑक्टोबर २०२५ मध्ये सुरू करण्यात आलेल्या १२२ अभियंत्यांच्या बदल्यांचे आदेश आता रद्द करण्यात येत आहेत."